१३ वर्षाची मुलगी, ४७ वर्षाचा आरोपी; अश्लील व्हिडीओ दाखवत म्हणाला, माझ्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना, सुनील पवारला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:37 IST2026-02-06T16:36:28+5:302026-02-06T16:37:48+5:30
मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४७ वर्षीय व्यक्तीने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर जे केले ते संतापजनक आहे. त्याला मालाडमधून अटक करण्यात आली.

१३ वर्षाची मुलगी, ४७ वर्षाचा आरोपी; अश्लील व्हिडीओ दाखवत म्हणाला, माझ्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना, सुनील पवारला अटक
अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवून माझ्या शरीरसंबंध ठेव असे म्हणत बळजबरी करणाऱ्या एका ४७ वर्षीय व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सुनील पवार असे आरोपीचे नाव असून, त्याने यापूर्वीही इतर मुलींशी असेच कृत्ये केले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला आहे.
आरोपी सुनील पवार हा कांदिवली पश्चिम येथील रहिवाशी आहे. मालाडमध्ये त्याला अटक करण्यात आली.
मुलीसोबत नेमके काय घडले?
मालाड पोलिसांनी सांगितले की, 'एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी अल्पवयीन मुलींचा पाठलाग करायचा आणि त्यानंतर त्यांना पॉर्न मुव्ही दाखवायचा. व्हिडीओ दाखवल्यानंतर त्या मुलींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा.'
'आरोपीने मालाड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत अशाच पद्धतीचे कृत्ये केले. त्याने मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवला आणि तिला शरीरसंबंध ठेवण्यासाठी म्हणू लागला. मुलगी त्याच्या तावडीतून घरी आली आणि तिने आईवडिलांना याची माहिती दिली.'
याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. त्याला मालाडमध्येच अटक करण्यात आली. आरोपीने इतर कोणत्या मुलींसोबत अशा प्रकारचे कृत्ये केले त्याचाही तपास करत आहेत.