मुंबईत कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 19:52 IST2019-07-13T19:52:25+5:302019-07-13T19:52:59+5:30
गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे.

मुंबईत कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
मुंबई - गोरेगाव येथील नाल्यात पडून एक बालक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे. हा मुलगा वरळी सी लिंकजवळ कोस्ट रोडच्या बांघकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाला होता.
कोस्टल रोडच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदण्यात आले असून, वरळी सी लिंकजवळ खोदलेल्या अशाच एका खड्ड्यात आज एक 12 वर्षीय मुलगा पडला. पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या खड्ड्यात हा मुलगा बुडाला. दरम्यान, त्याला खड्ड्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Mumbai: A 12-year-old boy drowned in a pit dug for a Coastal Road Project at Coastal Road, Worli Sea Link today; was admitted to nearby hospital by locals where he was declared brought dead. pic.twitter.com/HYtNzOujDG
— ANI (@ANI) July 13, 2019