११४ कोटींचे घोटाळा प्रकरण, CBIचे अनिल अंबानींच्या कार्यालयांवर छापे; २ माजी संचालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 07:34 IST2026-03-27T07:34:05+5:302026-03-27T07:34:05+5:30

अंबानी यांच्या या कंपनीने स्टेट बैंकप्रणित ११ बँकांकडून ७३५ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती.

114 crore scam case cbi raids anil ambani offices 2 former directors booked | ११४ कोटींचे घोटाळा प्रकरण, CBIचे अनिल अंबानींच्या कार्यालयांवर छापे; २ माजी संचालकांवर गुन्हा

११४ कोटींचे घोटाळा प्रकरण, CBIचे अनिल अंबानींच्या कार्यालयांवर छापे; २ माजी संचालकांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स टेलिकॉम कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जप्रकरणी झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी मुंबईत छापेमारी केली. ही छापेमारी कंपनीच्या कार्यालयात तसेच कंपनीच्या दोन माजी संचालकांच्या निवासस्थानी झाल्याची माहिती आहे.

अंबानी यांच्या या कंपनीने स्टेट बैंकप्रणित ११ बँकांकडून ७३५ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती.

११४ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा ठपका ठेवत सीबीआयने रिलायन्स टेलिकॉम कंपनी तसेच कंपनीचे माजी संचालक सतीश सेठ, गौतम बी दोषी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच अनुषंगाने ही छापेमारी झाली.
 

Web Title : 114 करोड़ घोटाले में सीबीआई का अनिल अंबानी के कार्यालयों पर छापा

Web Summary : सीबीआई ने भारतीय स्टेट बैंक से जुड़े ऋण चूक मामले में अनिल अंबानी के रिलायंस टेलीकॉम के मुंबई कार्यालयों पर छापा मारा। एजेंसी ने कंपनी और दो पूर्व निदेशकों के खिलाफ मामला दर्ज किया, जिसमें ₹735 करोड़ के ऋण से संबंधित ₹114 करोड़ की वित्तीय हेराफेरी का आरोप लगाया गया है।

Web Title : CBI Raids Anil Ambani's Offices in 114 Crore Scam Case

Web Summary : CBI raided Anil Ambani's Reliance Telecom offices in Mumbai regarding a loan default case involving State Bank of India. The agency filed a case against the company and two former directors, alleging a ₹114 crore financial misappropriation related to ₹735 crore loan.