विजा, पुरांचे ११ बळी; कोकण, पुणे, साताऱ्याला ‘रेड अलर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 05:24 IST2023-07-27T05:23:43+5:302023-07-27T05:24:05+5:30

कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात बुधवारी पुन्हा पावसाने जोर धरला. अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली.

11 victims of lightning, floods; 'Red Alert' for Konkan, Pune, Satara | विजा, पुरांचे ११ बळी; कोकण, पुणे, साताऱ्याला ‘रेड अलर्ट’

विजा, पुरांचे ११ बळी; कोकण, पुणे, साताऱ्याला ‘रेड अलर्ट’

मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात बुधवारी पुन्हा पावसाने जोर धरला. अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. तर विजा कोसळून एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. दहा जखमी झाले आहेत. विविध दुर्घटनांमध्ये राज्यभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला. तर दहाजण गंभीर झाले. मृतांमध्ये देलनवाडीत (ता. सिंदेवाडी) दोन महिला, बेटाळा (ता. ब्रह्मपुरी) येथील एक महिला, वेळवा माल (ता. पोंभूर्णा) येथील एक महिला, चनई(बु. ता. कोरपना) युवा शेतकरी, चिवडा वनक्षेत्रात (ता. गोंडपिपरी) येथील वनमजुराचा समावेश आहे. तर दहाजण जखमी झाले आहेत.

Web Title: 11 victims of lightning, floods; 'Red Alert' for Konkan, Pune, Satara