गुढीपाढव्याच्या खास मुहूर्तावर १० हजार वाहने मुंबईकरांच्या दारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:10 IST2026-03-20T09:08:46+5:302026-03-20T09:10:21+5:30
अनेक वाहन डिलर्सनी विशेष सवलती आणि ऑफर्स जाहीर केल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेत नवीन वाहने खरेदी केली.

गुढीपाढव्याच्या खास मुहूर्तावर १० हजार वाहने मुंबईकरांच्या दारात
मुंबई : गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांमघ्ये वाहन खरेदीचा उत्साह होता. यावर्षी ९ हजार ९७२ नव्या वाहनांची त्यांनी खरेदी केली. ९ मार्च ते १९ मार्च या कालावधीत या वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामध्ये २,४०४ कार आणि ७,५६८ दुचाकींचा समावेश होता. अनेक वाहन डिलर्सनी विशेष सवलती आणि ऑफर्स जाहीर केल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेत नवीन वाहने खरेदी केली.
९ ते १९ मार्च वाहन नोंदणी
आरटीओ दुचाकी /कार एकूण
मुंबई सेंट्रल २०४९ /७४८ २७९७
वडाळा १५०९/५७० २०७९
अंधेरी २३०४/५९४ २८९८
बोरिवली १७०६/४९२ २१९८
एकूण ७५६८/ २४०४ ९९७२
...म्हणून १० दिवस अगोदर नोंदणी
गुढीपाडव्यानिमित्त इलेकट्रोनिक वस्तू, सोने, घर आणि वाहन खरेदीला सर्वाधिक पसंती दिली जाते. यावर्षी मुहूर्तावर मुंबईकरांनी पसंतीचे वाहन घरी उत्साहामध्ये नेले. या दिवशी वाहनांची ‘डिलीव्हरी’ घेताना अडचणी येऊ नयेत म्हणून साधारण १० दिवस अगोदर नोंदणी सुरू करण्यात येते. त्यानुसार यावर्षी ९ मार्च ते १९ मार्च या कालावधीत मुंबईमध्ये तब्बल ९ हजार ९७२ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली.