हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:02 IST2022-05-24T11:02:13+5:302022-05-24T11:02:34+5:30

संजय राऊत यांनी मला १०० कोटी रुपये द्यावेत किंवा ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी दाव्यात केली आहे. 

100 crore claim against Sanjay Raut in High Court | हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा

हायकोर्टात संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : कथित १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांना गोवल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात त्यांनी १०० कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

संजय राऊत यांनी मला १०० कोटी रुपये द्यावेत किंवा ती रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करावी, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी दाव्यात केली आहे. 

Web Title: 100 crore claim against Sanjay Raut in High Court