५ महिन्यांत रस्ते धुण्यासाठी १० कोटी खर्च; १२५ टँकर घेणार भाडेतत्त्वावर; प्रदूषणमुक्तीसाठी लागेल पाण्यासारखा पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:44 IST2026-02-20T11:43:21+5:302026-02-20T11:44:44+5:30
मुंबईत सध्या अनेक विकासकामे सुरू असल्याने शहरातील रस्त्यांवर धूळ जमा होऊन ती हवेत पसरते. त्यावर उपाय म्हणून उच्च दाबाच्या पाण्याचा वापर करून हे रस्ते धूळमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

५ महिन्यांत रस्ते धुण्यासाठी १० कोटी खर्च; १२५ टँकर घेणार भाडेतत्त्वावर; प्रदूषणमुक्तीसाठी लागेल पाण्यासारखा पैसा
मुंबई :मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. धूळ नियंत्रणासाठी पालिकेकडून २४ विभागांतील रस्ते, वर्दळीचे पदपथ पाण्याने धुवून काढले जातात. परंतु, आधीच्या पाण्याच्या टँकरचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने १२५ टँकर भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मुंबईत सध्या अनेक विकासकामे सुरू असल्याने शहरातील रस्त्यांवर धूळ जमा होऊन ती हवेत पसरते. त्यावर उपाय म्हणून उच्च दाबाच्या पाण्याचा वापर करून हे रस्ते धूळमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. दोन हजार, पाच हजार आणि १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे पाण्याची फवारणी केली जाणार आहे. गल्लीबोळांतील रस्त्याच्या सफाईसाठी ते उपयुक्त ठरणार आहेत. पुढील पाच महिन्यांसाठी टँकर भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, यासाठी जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
भाडेतत्त्वावरील पाच हजार लिटर क्षमतेच्या प्रति टँकरच्या फेरीसाठी चार हजार २०० ते पाच हजार रुपये, तर नऊ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी साडेसहा हजार ते सात हजार २०० रुपये इतका खर्च येतो.
‘हवेच्या गुणवत्तेत सुधारणेचा दावा’ टँकरसह ‘जेटिंग’ व्यवस्था उपलब्ध
दिली असून, उच्चदाबाच्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे रस्त्यांवरील धूळ अधिक प्रभावीपणे साफ होईल. शहरातील स्वच्छता वाढण्यासह हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. वाढत्या बांधकामांमुळे निर्माण होणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याचा वापर नसल्याचा दावा
मुंबईत दोन हजार ५० किलोमीटरचे रस्ते असून ते धुण्यासाठी मलनिःसारण विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात फेरप्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापरही केला जातो. पिण्याच्या पाण्याचा वापर करत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.