Join us  

टाटा समूहातर्फे मुंबई पालिकेला प्लाझ्मा थेरपीसाठी १० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 6:40 AM

मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले.

मुंबई : समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्या वेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समूहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसरतन टाटामहाराष्ट्र