Daily Top 2Weekly Top 5

मारुती संस्थानात आजपासून मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन व जन्मोत्सव सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:30 IST

विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बोक द व्हाक-पणजी येथील श्री मारुती संस्थानात श्री महारुद्र हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेचा द्वितीय वर्धापन दिन व जन्मोत्सव सोहळा ३१ मार्च ते २ एप्रिलदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

३१ रोजी वर्धापन दिनानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी पार पडतील. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

१ एप्रिल रोजी सकाळी श्री महारुद्र हनुमान मूर्तीला अभिषेक करण्यात येईल. दुपारी तीर्थप्रसाद वाटप होणार असून सायंकाळी ७ वाजता परिसरातील महिला व मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता सिद्धकला मोहक सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे.

२ रोजी सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून दुपारी महाप्रसाद दिला जाणार आहे. सायंकाळी चिराग दीपक त्रिपाठी व सहकलाकारांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ८ वाजता आरत्या, तीर्थप्रसाद व परिसरातील महिला व मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्धापन दिन व जन्मोत्सव सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष नरेश उसगावकर, सचिव विजय हर्लणकर व खजिनदार विनोद परब यांनी केले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Maruti Sansthan Celebrates Anniversary and Birth Anniversary with Grand Festivities

Web Summary : The Shree Maruti Sansthan in Panaji celebrates its anniversary and Hanuman Jayanti from March 31st to April 2nd with religious rituals, processions, cultural programs, and community feasts. Devotees are invited.
टॅग्स :गोवाहनुमान जयंतीभारतीय उत्सव-सण