Join us  

तुमचं आवडतं चॉकलेट ठरवतो तुमचा स्वभाव

By admin | Published: February 09, 2017 4:14 PM

व्हेलेंनटाईन वीकमधील आजचा तिसरा दिवस म्हणजे आज आहे चॉकलेट डे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 9 - व्हेलेंनटाईन वीकमधील आजचा तिसरा दिवस म्हणजे आज आहे चॉकलेट डे.  प्रेमातील गोडवा आणखी वाढवण्याचा दिवस. व्हेलेंनटाईन वीकमधील आजचा सर्वात गोड दिवस.  या दिवशी आवडत्या व्यक्तीला चॉकलेट देऊन प्रेमातील गोडवा आणखी वाढवला जातो.  
 
प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा नाराज गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंडला मनवण्यासाठी चॉकलेट देऊन त्यांच्याप्रती असलेली आपली भावना व्यक्त केली जाते. पण, जे सिंगल असतात अशी काही मंडळी स्वतःसाठीच चॉकलेट्स, गिफ्ट वगैरे घेऊन स्वतःचे लाड पुरवतात. विशेष म्हणजे या अपवादात्मक मंडळींना चॉकलेट्स, आयस्क्रिम वगैर कुणाबरोबर शेअर करणं आवडत नाही. 
पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आवडत्या चॉकलेटनुसार तुमचा स्वभाव ओळखता येतो. नाही म्हणता, तर मग वाचा ही मजेशीर माहिती.  
 
व्हाईट चॉकलेट
मिल्की बार किंवा कोणतेही व्हाईट चॉकलेट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुपर छान स्वभावाच्या व्यक्ती आहेत. व्हाईट चॉकलेट पसंत करणा-या व्यक्तींना सर्व चांगल्या गोष्टींप्रती प्रेम असते. मात्र ही माणसं किंचितशी अपरिपक्व असतात, मात्र ही काही वाईट बाब नाही. 
 
मिल्क चॉकलेट
ही माणसं अगदी सर्व ठिकाणी असतात, माहिती आहे का? कारण सर्व जण तुमच्या अवलंबून असता. मिल्क चॉकलेट आवडणारी व्यक्ती अतिशय गोड स्वभावाची असल्याने ती सर्वांच्या आवडीची आणि जवळची असते.  
 
डार्क चॉकलेट
जे डार्क चॉकलेटचे डाय हार्ट फॅन आहेत त्या व्यक्ती गंभीर आणि अनाकलनीय असतात. तसेच त्यांचे वर्तन अतिशय परिपक्व असते. 
 
 
सॉल्डेट चॉकलेट 
खूपच गोड आणि रुचकर अशा चवीचे चॉकलेट ब-याच जणांना आवडत नाही. ज्यांना सॉल्डेट चॉकलेट आवडतं, अशा व्यक्ती जरा हटके स्वभावाच्या असतात. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत समतोल सांभाळणा-या असतात. म्हणजे कोणत्याही परिस्थितीशी त्या जुळवून घेऊ शकतात. 
 
चॉकलेट बार
ज्यांना कँडी, स्निकर्स, टॉफी, किटकॅट अशा पद्धतीचे चॉकलेट आवडते, त्या व्यक्तींनी स्वतःमधील लहान मुलाला जिवंत ठेवले आहे. या व्यक्ती ऊर्जा, खेळकर, आनंद, मस्ती, उत्साहाने भरलेले पॅकेज असतात. 
 
फ्रुट अँड नट्स
फ्रुट अँड नट्स असलेले चॉकलेट आवडणा-या व्यक्तींमध्ये थेट बोलणे, उपरोधिक लिहिणे आणि टोमणे मारण्याची कला असते. सर्वच नाही पण काही जण तुमची कंपनी नक्कीच एन्जॉय करतात, तर काही जण तुमच्या याच स्वभावावर जाहीर प्रेम व्यक्त करतात. तुमच्यातील हा स्वभाव त्यांना अजिबात चुकीचा वाटत नाही. 
 
ऑरगॅनिक चॉकलेट 
मला जे हवंय ते मी मिळवणारच, मग त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, ऑरगॅनिक चॉकलेट आवडणा-या व्यक्ती अशा स्वभावाच्या असतात.  स्वतःच्या अटींवर चांगलं जीवन जगणं त्यांना अधिक पसंत असते. 
 
कोको पावडर
कोको पावडर आवडणा-या व्यक्ती पुढाकार घेणा-या, उत्तम कल्पनाशक्ती असणा-या असतात.  
मनमिळाऊ स्वभाव असल्याने हरत-हेचे मित्र-मैत्रिणी त्यांना असतात. 
 
मेल्डेट चॉकलेट
या व्यक्ती सौम्य स्वभावाच्या असतात. घराबाहेर जाऊन पार्टी, नाईटआऊट करण्यापेक्षा तुम्हाला स्वतःच्या खोली बसून एखादे पुस्तक वाचत बसायला आवडते. पण दुसरीकडे घरातच पार्टीचे वातावरण तयार करण्याचा गुणही त्यांच्यात आहे. सर्वांना तुमच्यासोबत फिरणे, वेळ घालवणे आवडते. भलेही मग वेळ खर्च झाला तरी तुम्हाला कोणी दोष देत नाही. कारण स्वभावच हटके आहे ना.
 
चॉकलेट आवडतच नाही
चॉकलेट न आवडणा-या विक्षिप्त नाही, मात्र वेगळ्या स्वभावाच्या असता. त्यांच्यात वेगळे काही तरी करण्याची हिम्मत असते. उंदरांच्या शर्यतीत तुम्हाला विश्वास नाही, सर्वांना खूश ठेवणे तुम्हाला जमत नाही, मात्र तुम्हाला उत्तम समतोल राखता येतो.