Join us

तू विसरूनी जारे...

By admin | Updated: October 16, 2016 03:06 IST

सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप कोणाला आठवत नसेल, असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण बॉलिवूडमधील सर्वांत वादग्रस्त ब्रेकअप म्हणून आजही त्याकडे पाहिले जाते.

- Satish Dongreसलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप कोणाला आठवत नसेल, असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण बॉलिवूडमधील सर्वांत वादग्रस्त ब्रेकअप म्हणून आजही त्याकडे पाहिले जाते. एके काळी एकमेकांपासून एक क्षणही दूर न राहणाऱ्या या स्टार्सनी मात्र ब्रेकअपनंतर तब्बल पाच वेळ समोरासमोर येण्याचा योग आला असतानाही एकमेकांचे तोंड पाहणे पसंत केले नाही. जेव्हा-केव्हा त्यांच्यावर एकमेकांसमोर येण्याचा प्रसंग उद्भवला, तेव्हा त्यांनी दुसऱ्या मार्गाने जाणे पसंत केले. आता सलमान होस्ट असलेल्या बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये या दोघांचा एकमेकांसमोर सामना होईल का? याबाबत वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने सलमानबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने दोघांमधील कटुता संपली की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सलमान-ऐश्वर्याप्रमाणेच इतरही काही पूर्वाश्रमीची जोडपी आहेत, जी आजही एकमेकांसमोर येणे टाळतात. आता याला भीती म्हणावे की कटूता, हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे. ‘तू विसरूनी जा रे विसरूनी जा... तुझ्या जीवनी चुकूनी आले... चुकले होते वाट’ या गाण्यांप्रमाणेच याही कलाकारांना असेच काहीसे म्हणावेसे वाटते, हे नक्की.जॉन-विद्या २००७मध्ये आलेल्या ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटा वेळी एकत्र आलेले जॉन अब्राहम आणि विद्या बालन हेदेखील काही काळानंतर विभक्त झाले. ब्रेकअपनंतर दोघांनीही एकमेकांसमोर येणे टाळले. कारण, जॉन पुन्हा त्याची एक्स गर्लफ्रेंड बिपाशा बसूच्या प्रेमात पडला होता अन् तिला नाराज न करण्यासाठीच त्याने विद्यापासून दूर जाण्याचे ठरविले होते. पुढे तर ‘शूट आऊट अ‍ॅट वडाळा’ चित्रपटात केवळ जॉन मुख्य भूमिकेत असल्याने विद्याने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या दोघेही संसारात मग्न असून, एकमेकांपासून दूर राहणे पसंत करीत आहेत.करिष्मा-अभिषेकतब्बल पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून अन् साखरपुडा करूनदेखील ब्रेकअप होत असेल, तर एकमेकांचा सामना करतील तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन या एक्स कपलच्या नात्याची अक्षरश: ट्रॅजेडी झाली. साखरपुुडा झाल्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकतील, असे निश्चित असतानाच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. तेव्हापासून हे दोघे एकमेकांसमोर येणे टाळत आहेत. करिष्माच नव्हे, तर करिना कपूरदेखील अभिषेकबरोबर काम करण्यास फारशी उत्सुक नाही. तीदेखील अभिषेकपासून दूर राहणेच पसंत करते. अमिताभ-रेखाअमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘दो अंजाने’ चित्रपटाच्या सेटवर दो अंजाने केव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले, हे कळालेच नाही. पुढे दोघांनी बऱ्याचशा चित्रपटांत एकत्र काम केले. मात्र, अमिताभने रेखाचा कधीच जाहीरपणे स्वीकार केला नाही, तर रेखा दोघांमधील नाते जाहीरपणे स्वीकारण्यास अक्षरश: उतावीळ झाली होती. मात्र, अमिताभ याला तयार नसल्याने ही जोडी तुटली. अमिताभने जया यांच्याशी लग्न केले; मात्र आजही या दोघांचा एकमेकांशी सामना होतो, तेव्हा नजर चुकवून दोघेही वेगवेगळ्या रस्त्यांनी जाणे पसंत करतात. हृतिक - कंगनाहृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यातील वाद कोणाला माहीत नसेल तरच नवल. सुझानसोबतच्या घटस्फोटाच्या अगोदरपासूनच कंगनाच्या प्रेमात दिवाना असलेल्या हृतिकच्या लव्हस्टोरीची ट्रॅजेडी झाली. क्रिश-३ पासून जवळीकता वाढलेल्या हृतिक आणि कंगनाची लव्हस्टोरी नंतरच्या काळात अक्षरश: चव्हाट्यावर आली. प्रकरण इतके वाढले, की अखेर दोघांनीही न्यायालयात धाव घेतली. अशात ते भविष्यात एकत्र काम करतील, याची शक्यता फारच धूसर आहे.शाहीद-करीना२००४मध्ये प्रेमाची जाहीरपणे कबुली देणारे शाहीद कपूर आणि करीना कपूर यांचीदेखील प्रेमकहाणी काहीशी अशीच आहे. शाहीदने तर करीनासाठी नॉनव्हेज खाणे बंद केले होते; त्यामुळे हे दोघेही आयुष्यभर एकत्रित राहतील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, २००७मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. पुढे करीनाने सैफशी जवळीकता वाढवली, तर शाहीदचे नाव अमृता राव हिच्याशी जोडले गेले. आता दोघेही आपापल्या संसारात व्यस्त असून, एकमेकांसोबत काम करण्यास दोघांच्याही मनात भीती आहे.