Join us  

दिवाळी पार्टी संपल्यावर दिव्यांका त्रिपाठीने केले असे काही की, तिलादेखील आवरले नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 9:00 PM

एकता कपूरच्या पार्टीतून बाहेर पडताना दिव्यांकाची चांगलीच फजिती झाली. या फजितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ठळक मुद्देपार्टीच्या स्थळावरून बाहेर आल्यानंतर दिव्यांका घरी जाण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसण्याऐवजी दुसऱ्यांच्याच गाडीत बसली.विवेकच्या हे लक्षात आल्यानंतर विवेक लगेचच आपल्या पत्नीला घेऊन आला आणि तिला आपल्या गाडीत बसवले. स्वतःच्या गाडीत जाऊन बसेपर्यंत दिव्यांका आणि विवेक हे दोघे देखील खळखळून हसताना दिसले.

दिवाळीच्या निमित्ताने अनेक बॉलिवूडमधील आणि छोट्या पडद्यावरील कलाकार दर वर्षी पार्टी आयोजित करत असतात. बालाजी टेलिफ्लिम्सची सर्वेसर्वा आणि छोट्या पडद्यावरची क्विन एकता कपूरने देखील दिवाळीच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबतच छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती. या पार्टीची चर्चा मीडियात चांगलीच रंगली होती. 

एकता कपूरच्या सध्या अनेक मालिका छोट्या पडद्यावर सुरू आहेत. त्यामध्ये नागिन, ये है मोहोब्बते, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिका तर प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत. नागिन ही मालिका तर टीआरपीच्या रेसमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून अव्वल आहे तर ये है मोहोब्बते ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ये है मोहोब्बते या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, अनिता हंसनंदानी हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच दिव्यांकाचा पती विवेक दहिया देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. दिव्यांका आणि विवेक हे एकताच्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत असून खाजगी आयुष्यात देखील त्यांचे एकता सोबतचे संबंध खूपच छान आहेत. त्यामुळे ते दोघे आवर्जून एकता कपूरच्या दिवाळी पार्टीसाठी गेले होते. पण या पार्टीतून बाहेर पडताना दिव्यांकाची चांगलीच फजिती झाली. या फजितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

एकता कपूरकडे दिवाळीच्या पार्टीत खूप धमाल मस्ती केल्यानंतर दिव्यांका आणि विवेक घरी जाण्यासाठी निघाले. पण घरी जाताना एक मजाच झाली. पार्टीच्या स्थळावरून बाहेर आल्यानंतर दिव्यांका घरी जाण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसण्याऐवजी दुसऱ्यांच्याच गाडीत बसली. विवेकच्या हे लक्षात आल्यानंतर विवेक लगेचच आपल्या पत्नीला घेऊन आला आणि तिला आपल्या गाडीत बसवले. दिव्यांकाने ही कृती केल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यानाच नव्हे तर दिव्यांकाला देखील हसू आवरत नव्हते. स्वतःच्या गाडीत जाऊन बसेपर्यंत दिव्यांका आणि विवेक हे दोघे देखील खळखळून हसताना दिसले. हा दिव्यांकाचा व्हिडिओ सध्या तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीये है मोहब्बतेंविवेक दहिया