Join us

यामीला करायचंय मराठी चित्रपटात काम

By admin | Updated: February 1, 2016 08:11 IST

सध्या मराठी चित्रपटात काम करायची इच्छा अनेक बॉलीवूड मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर इच्छा बोलून दाखविल्यावर अनेकांना मराठी चित्रपटात काम करायची संधीदेखील मिळाली आहे

सध्या मराठी चित्रपटात काम करायची इच्छा अनेक बॉलीवूड मंडळींकडून व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर इच्छा बोलून दाखविल्यावर अनेकांना मराठी चित्रपटात काम करायची संधीदेखील मिळाली आहे. आता विद्या बालनचेच पाहा ना, तिने मराठीत काम करायची इच्छा आहे, असे बोलून काय दाखवले आणि आता तिचा ‘एक अलबेला’ हा मराठी चित्रपट लवकरच पाहायलाही मिळेल. त्यापाठोपाठ धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही स्क्रिप्ट चांगली मिळाल्यास मराठीत नक्कीच काम करेन, असे बोलून दाखवले. आता या दोघींनंतर फेअर अँड लव्हली गर्ल आणि कन्नड, तेलगू, तमिळ, हिंदी अशा विविध भाषांतील चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री यामी गौतमनेही मराठी चित्रपटात काम करायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामी याबद्दल सांगते, की इतक्या भाषांतील चित्रपटात काम केल्यावर मराठीतही काम करायची संधी मिळाल्यास नक्कीच करेन; फक्त तशी स्क्रिप्ट मिळायला हवी. आता यामीस मराठीतही पदार्पण करायची संधी कधी मिळतेय आणि ही संधी कोण देतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.