Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yami Gautam : जेव्हा यामीने रोडरोमिओच्या कानाखाली लगावली; सांगितला तो धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:44 IST

अनेक बॉलिवुड अभिनेत्री बऱ्याचदा त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटनांबद्दल खुलेपणाने बोलतात. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्री यामी गौतमने तिच्यासोबत झालेला एक किस्सा सांगितला.

Yami Gautam : अनेक बॉलिवुड अभिनेत्री बऱ्याचदा त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटनांबद्दल खुलेपणाने बोलतात. नुकतेच एका मुलाखतीत अभिनेत्री यामी गौतमने तिच्यासोबत झालेला एक किस्सा सांगितला. छेड काढणाऱ्या रोड रोमिओच्या कशी तिने कानाखाली लगावली होती हे तिने शेअर केले आहे.

महिलांची छेड काढणे, अॅसिड हल्ला या घटना काही बंद होत नाहीत. महिलांनी घाबरुन जावू नये, बेधडक लढावे यासाठी अभिनेत्री यामी गौतमने तिच्या आयुष्यात घडलेली एक घटना सांगितली. ती म्हणाली, 'मला व्हॅलेंटाईन आला की नर्व्हस व्हायला व्हायचं. आम्ही शाळा, क्लासेस साठी रिक्षानेच जायचो. आम्ही रिक्षातून जाताना काही रोड रोमिओ मागे लागायचे. ते आमच्याकडेच बघायचे तेव्हा विचित्र वाटायचं.

ती पुढे म्हणाली, मी एकदा अशीच रिक्षातून जात होते तेव्हा दोन मुलं गाडीवरुन आमच्या बाजूलाच आले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर एकाने त्याचा हात पुढे केला. कदाचित त्याला माझा हात पकडायचा होता. त्याचक्षणी मी त्याच्या कानाखाली लगावली. माझ्यात कसं काय इतकं धाडस आलं ठाऊक नाही पण ते दोघेही घाबरुन निघून गेले. 

यामी गौतम ही हिमाचलची असून तिथेच तिचे शिक्षण झाले आहे. ती लहानपणापासूनच थोडी लाजरी बुजरी आहे असं ती म्हणते.तिला अभिनयाची आवड असल्याने ती मुंबईत आली. आधी जाहिराती आणि नंतर मालिकांमधून तिने काम केले. यामीने बदलापूर, उरी, काबिल, बाला, विक्की डोनर या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :यामी गौतमबॉलिवूड