नवी दिल्ली - देशातील रिसर्च अँड एनालिसिस विंग म्हणजेच RAW (रॉ) चे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी भारतात बनत असलेल्या स्पाय सिनेमांवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या देशात बनवण्यात येत असलेले हेरगिरी म्हणजेच जासूसी बॅकग्राउंडचे चित्रपट रिअॅलिटीपासून कोसों दूर आहेत. विशेष म्हणजे आपण शाहरुख खानचापठाण सिनेमा पाहिला नाही, आणि पाहायची इच्छाही नाही, असेही विक्रम सूद यांनी मीडियाशी बोलताना म्हटले.
विक्रम सूद यांनी २०१२ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा एक था टायगर हा चित्रपट पाहिला होता. मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर मला मोठं हसू आल्याचं सूद यांनी म्हटलं. पठाण, एक था टायगर असे स्पाय चित्रपट आपण केवळ मनोरंजन आणि एन्जॉयमेंटसाठी पाहू शकतो. मात्र, या चित्रपटाची सत्यता शोधणयास जाल, तर निराश होऊन जाल, असेही सूद यांनी म्हटले आहे.
द रणवीर शो मध्ये बोलताना विक्रम सूद यांनी म्हटले की, स्पाय चित्रपटात आर्टची कमतरता जाणवते. मी पठाण चित्रपट पाहिला नाही, पण तो पाहून वेळही वाया घालवणार नाही. हा चित्रपट आणखी अधिक चांगला बनवता आला असता. तुम्ही जेम्स बॉन्डसारखे चित्रपट बनवू इच्छिता. मात्र, सत्यता ही आहे की तेही खरं, रिअॅलिटी असलेले चित्रपट नाहीत. तुम्ही तुमच्या चित्रपटात दाखवता की, रॉ चा एजंट, आयएसआयच्या महिला जासूससोबत आनंदाने राहत आहे. याचा अर्थ काय आहे? असा सवालच सूद यांनी विचारला आहे.
सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटातील एक किस्सा सांगत त्यांनी या चित्रपटातील अतिशयोक्तीवर भाष्य केलं. मात्र, चित्रपटात मनोरंजनही असायलाच हवं, असेही ते म्हणाले. सलमान खान पाकिस्तान बॉर्डरवर लहान मुलीला सुरुंमधून घेऊन जातो, हे अतिच झालं, असेही सूद यांनी स्पाय चित्रपटांवर भाष्य करताना म्हटले.