Join us  

‘धूम4’मधून बॉलिवूड डेब्यू करणार प्रभास?

By admin | Published: October 26, 2016 4:41 AM

‘बा हुबली2’ अर्थात ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’मधील तेलगू सुपरस्टार प्रभासचा फर्स्ट लूक नुकताच सर्वांसमोर आला. मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले.

‘बा हुबली2’ अर्थात ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’मधील तेलगू सुपरस्टार प्रभासचा फर्स्ट लूक नुकताच सर्वांसमोर आला. मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचे पहिले पोस्टर जारी करण्यात आले. या पोस्टरमध्ये साखळदंडांमध्ये जखडलेला, आक्रमक लूकमधील प्रभास दिसतो आहे. ‘बाहुबली’ 2015 मध्ये खांद्यावर विशाल शिवलिंग उचललेला प्रभास पाहून रसिक थक्क झाले होते. यशराज बॅनरच्या ‘धूम 4’मधून प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार, अशीही चर्चा आहे. अर्थात प्रभासने ही चर्चा नाकारली आहे. पोस्टर लॉन्च सोहळ्यात प्रभासला याबद्दल विचारण्यात आले. यावर प्रभासने नकारार्थी उत्तर दिले. बॉलिवूडच्या काही चांगल्या आॅफर्स मला मिळाल्या, हे खरे आहे. मला बॉलिवूडमध्ये कामच करायचे नाही, असे मी म्हणणार नाही. उलट बॉलिवूडमध्ये काम करायला मला मनापासून आवडेल. पण सध्या माझ्याकडे माझ्याच होम प्रॉडक्शन्सचे दोन सिनेमे आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय मी कुठलेही नवे चित्रपट स्वीकारणार नाही, असे प्रभासने स्पष्ट केले.