पाकिस्तानी ड्रामा क्वीन हरीम शाह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हरीम शाहचा एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. यात तिने लिप सर्जरी केल्याबाबत व्हिडीओत म्हटलं आहे. परंतु या व्हिडिओत खास म्हणजे हरीम शाहनं तिच्या ओठांची सर्जरी अर्ध्यावरच सोडली आहे. या व्हिडीओत ती सुजलेल्या ओठांनी फोलोअर्ससोबत संवाद साधताना दिसत आहे. हरीम शाहची अशी अवस्था का झाली? याचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
अचानक अर्धवट सोडावी लागली सर्जरी
हरीम शाहनं सांगितले की, ती यूकेमध्ये लिप सर्जरी करण्यासाठी गेली होती. सर्जरी सुरु असताना मला मध्येच एक कॉल आला. या कॉलवर मला पाकिस्तानी एफआयएने त्यांचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिल्याचं कळवलं. त्यामुळे सर्जरी करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे हरीमनं अर्धवट सर्जरी करत तसेच ठेवले. ज्यामुळे तिचे होठ सुजलेले दिसले.
नोटांचे बंडल घेऊन ब्रिटनला पोहचली
सोशल मीडिया व्हिडीओतच हरीम शाह ब्रिटीश पाउंड नोटांची दोन बंडल घेऊन बसल्याचं दिसून आलं होतं. पहिल्यांदाच पाकिस्तानातून लंडनला इतकी मोठी रक्कम घेऊन आल्याचं हरीमनं म्हटलं. त्यानंतर एफआयएने ब्रिटीश पाउंडच्या त्या पैसे दाखवणाऱ्या व्हिडीओची चौकशी सुरु केली. पाकिस्तान फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यूच्या मते, कुठलाही प्रवासी कितीही प्रमाणात परदेशी पैसे पाकिस्तान आणू शकतो. परंतु विना परवानगी १० हजार डॉलरपेक्षा जास्त परदेशी पैसा बाहेर घेण्यास मज्जाव आहे.
कोण आहे हरीम शाह?
हरीम शाह ही पाकिस्तानी सोशल मीडिया स्टार आहे. तिचे अनेक व्हिडीओ खूप व्हायरल झालेत. मागील वर्षी हरीम शाहचा एक व्हिडीओ वादात अडकला होता. त्यात तिने मुफ्ती अब्दुल कवीच्या श्रीमुखात लगावली होती. मुफ्ती तिच्यासोबत अश्लिल बोलत असल्याचा आरोप हरीमनं केला होता. हरीम शाहचे टिकटॉकवर सर्वात जास्त फॅन फॉलोविंग आहे. इतकचं नव्हे तर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांच्यासोबत हरीम शाहचे संबंध असल्याचं समोर आलं होतं. एका जाहीर कार्यक्रमात हरीम शाहनं याचा खुलासा केला होता. रशीद यांनी हरीम शाह हिला नंबर मागितला होता. त्यानंतर गृहमंत्र्यांनी तिला मिस्डकॉल द्यायला सांगितलं होतं. रशीद यांनी हरीमला घरी येण्याचंही निमंत्रण दिल्याचं तिने कार्यक्रम कबुल केले होते.