Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलजीत दोसांझच्या खाजगी आयुष्यातील या गोष्टींविषयी खूपच कमी लोकांना आहे माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:10 IST

आज दिलजीतच्या खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत. 

ठळक मुद्देदिलजीत कधीच कोणत्या मुलाखतीत त्याच्या पत्नीचा उल्लेख करत नाही. तसेच सोशल मीडियावर देखील तो आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर करत नाही.

दिलजीत दोसांझने शेतकरी अभियानाला पाठिंबा दर्शवल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत आणि दिलजीत यांचे ट्विटरवर युद्ध रंगलं आहे. दिलजीत अतिशय मितभाषी असल्याचे आजवर सगळ्यांचे म्हणणे होते. पण शेतकरी आंदोलनात त्याने विविध गोष्टींवर भाष्य करत सगळ्यांचे मन जिंकले आहे. आज दिलजीतचा वाढदिवस असून त्याने पंजाबी तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच एक खूप चांगला गायक देखील आहे. आज दिलजीतच्या खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत. 

दिलजीतचे लग्न झालेले असल्याचे त्याच्या खूपच कमी चाहत्यांना माहीत आहे. कारण दिलजीत कधीच कोणत्या मुलाखतीत त्याच्या पत्नीचा उल्लेख करत नाही. तसेच सोशल मीडियावर देखील तो आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर करत नाही. त्याच्या पत्नीचे नाव संदीप कौर आहे. दिलजीतला त्याच्या खाजगी आयुष्याविषयी काहीही बोललेले आवडत नाही. त्याची पत्नी मीडियापासून दूर राहाणेच पसंत करते. त्याची पत्नी अमेरिकेत राहत असून त्यांना एक मुलगा देखील आहे असे म्हटले जाते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिलजीत आणि त्याच्या पत्नीत सगळे काही आलबेल नाहीये. दिलजीत कामात व्यग्र असल्याने काही वर्षांपूर्वी त्याने मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असे म्हटले जाते. पण दिलजीतने कधीच यावर भाष्य केले नाही. 

दिलजीतला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तो खूप लहान असल्यापासूनच गुरुद्वारामध्ये किर्तन गायचा. त्याने पंजाबी म्युझिक व्हिडिओद्वारे त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली. त्याने उडता पंजाब, वेलकम टू न्यूयॉर्क, फिल्लोरी यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रत्येक ट्वीटवर सोशल मीडियावर चर्चा रंगते.  

टॅग्स :दिलजीत दोसांझ