Join us  

अमरीश पुरी यांनी आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये का करू दिलं नाही काम? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 3:28 PM

Amrish Puri : जास्तीत जास्त सिनेमांमध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका केल्यात. तरीही त्यांना फॅन्सचं खूप प्रेम मिळालं. अमरीश पुरी यांनी अनेक दशके बॉलिवूडमध्ये काम केलं. पण त्यांचं करिअर काही सोपं नव्हतं.

बॉलिवूडचे महान अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) हे आज भलेही आपल्यात नसतील. पण ते सगळ्यांच्या आठवणींमध्ये नेहमीच राहतील. ते बॉलिवूडचे सगळ्यात मोठे व्हिलन म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचे सगळेच फॅन होते आणि आहेत. जास्तीत जास्त सिनेमांमध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका केल्यात. तरीही त्यांना फॅन्सचं खूप प्रेम मिळालं. अमरीश पुरी यांनी अनेक दशके बॉलिवूडमध्ये काम केलं. पण त्यांचं करिअर काही सोपं नव्हतं.

अमरीश पुरी मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आले होते. ते आधीच थिएटर करत होते. पण त्यांना अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. शेवटी त्यांनी सिनेमांसाठी ऑडिशन देणं बंद केलं होतं आणि विमा कंपनीमध्ये त्यांनी नोकरी सुरू केली होती. त्यांनी जवळपास 21 वर्ष नोकरी केली. पण नोकरी करत असतानाही त्यांना अभिनयाचं वेड सोडत नव्हतं. ते थिएटर करत राहिले.

अमरीश पुरी पृथ्वी थिएटरमध्ये नाटक करत होते. मोठ्या संघर्षानंतर त्यांना ओळख मिळू लागली. ते 40 वर्षांचे झाले तेव्हा त्यांना ‘रेशमा और शेरा’ सिनेमाची ऑफर मिळाली. 1971 मध्ये आलेल्या या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. अमरीश पुरी आपल्या आवाजासाठी, स्टाइलसाठी आणि शरीरयष्टीसाठी फेमस झाले. त्यांनी त्यानंतर 450 पेक्षा सिनेमात काम केल.

अमरीश पुरी यांचा शेवटचा सिनेमा ‘किसनाः द वॉरियर पॉएट’ होता. हा सिनेमा 2005 मध्ये आला होता. अमरीश पुरी यांनी एकापेक्षा एक यादगार भूमिका केल्या आणि सुपरहिट सिनेमांचा भाग राहिले. पण त्यांची इच्छा अशी होती की, त्यांचा मुलगा राजीव पुरी याने सिनेमात येऊ नये. राजीवला सिनेमात काम करायचं होतं, पण अमरीश पुरी यांनी त्याला समजाववं आणि त्याला दुसऱ्या फील्डमध्ये जाण्यास सांगितलं.

अमरीश पुरी यांनी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, जेव्हा त्यांचा मुलगा राजीव बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत बोलत होता तेव्हा इंडस्ट्रीची स्थिती बरोबर नव्हती. त्यांना मुलाची चिंता सतावत होती. त्यामुळे त्यांनी मुलाला सिनेमात काम करण्यास मनाई केली. नंतर राजीव पुरीने मर्चेंट नेव्ही ज्वॉइन केली.

टॅग्स :अमरिश पुरीबॉलिवूड