Join us

एमयूपी बँकेवर कोणी टाकला दरोडा?

By admin | Updated: November 5, 2016 02:25 IST

एमयूपी बँकेत दिवाळीचे सेलिब्रेशन होत असताना अचानक तीन दरोडेखोर बँकेत घुसतात.

 एमयूपी बँकेत दिवाळीचे सेलिब्रेशन होत असताना अचानक तीन दरोडेखोर बँकेत घुसतात. विशेष म्हणजे, बँकेवर दरोडा पडल्याचे कळताच पोलिसही तिथे येतात. त्यानंतर चोर आणि पोलिसांचे थरारनाट्य सुरू होते. या थरारनाट्यात पोलीस दरोडेखोरांना पकडण्यात यशस्वी होतात का? मालिकेतील सहा जणी या प्रसंगाला कशा सामोरे जातात? हे येणाऱ्या भागात पाहायला मिळणार असून या सहा जणी नेमक्या कोणाला पकडतात, नेहमीच काहीतरी गोंधळ करून बँकेत समस्या निर्माण करणाऱ्या या सहा मैत्रिणींमुळे नेमका कोणाला फायदा होतो? याचाही उलगडा होताना दिसणार आहे. चोर-पोलिसांच्या या मजेशीर भागात पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, गणेश रेवंडेकर आणि चंदू बारशिंगे हे कलाकार रसिकांना लोटपोट हसविण्यासाठी लवकरच येणार आहेत.