Join us  

जेव्हा शाहरूख खान बनतो 'डीजे'

By admin | Published: September 26, 2016 3:26 PM

बॉलिवूड किंग खान शाहरूख खानने आजवर अनेक भूमिका केल्या आहेत. शिक्षकापासून ते हॉकी प्रशिक्षकापर्यंतच्या भूमिकेत आपण शाहरूखला पाहिलं. मात्र 'डीजे'च्या भूमिकेत तुम्ही कधी शाहरूखला पाहिलं

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26- बॉलिवूड किंग खान शाहरूख खानने आजवर अनेक भूमिका केल्या आहेत. शिक्षकापासून ते हॉकी प्रशिक्षकापर्यंतच्या भूमिकेत आपण शाहरूखला पाहिलं. मात्र 'डीजे'च्या भूमिकेत तुम्ही कधी शाहरूखला पाहिलं नसेल.

ट्विटरवर सध्या शाहरूखचा एक व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. लंडनमधील टॉंमी संधू यांच्या रेडिओ शोमध्ये शाहरूख चक्क डीजे बनला होता. टॉंमी संधू यांनी शाहरूखला आपल्या शोमध्ये थोड्यावेळासाठी डीजे होण्याची संधी दिली आणि शाहरूखने लगेच होकार दिला. यावेळी आवडतं गाणं म्हणून शाहरूखने कनिका कपूरच्या 'जुगनी जी' या गाण्याची निवड केली.