Join us  

"बॉलिवूड मुलींसाठी सुरक्षित नाही", प्रिती झिंटाने केलं होतं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 3:57 PM

"कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊ नये", असं का म्हणाली होती प्रिती झिंटा?

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती झिंटाने ९०चं दशक गाजवलं. 'दिल से', 'कोई मिल गया', 'कल हो ना हो', 'वीर झारा', 'सोल्जर' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत प्रीती झिंटाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. अभिनय आणि सौंदर्याबरोबरच प्रीती झिंटा तिच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखली जाते. अनेक गोष्टींबद्दल प्रीती झिंटा उघडपणे भाष्य करताना दिसते. प्रीती झिंटाने बॉलिवूडबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.

"कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या मुली किंवा मुलांसाठी बॉलिवूड सुरक्षित नाही. फक्त फिल्मी बॅकग्राऊंड नाही. तर, कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या लोकांनी बॉलिवूडमध्ये येऊ नये. कारण, इथे असे अनेक लोक आहेत जे काम मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. अशात जर मी रस्त्याच्या मधोमध उभी राहून म्हणाले की आ बैल मुझे मार तर काय होईल", असं प्रीती एका मुलाखतीत म्हणाली होती.  प्रीतीचं हे वक्तव्य चर्चेत आलं होतं. 

दरम्यान, प्रीती झिंटा सध्या आयपीएलमुळे चर्चेत आहे. किंग्ज XII पंजाब या टीमची प्रीती मालकीण आहे. काही दिवसांपूर्वीच तिने रोहित शर्माबद्दल वक्तव्य केलं होतं. जर रोहित शर्मा IPL च्या मेगा लिलावात समोर आला तर मी त्याला संघामध्ये घेण्यासाठी जीवाची बाजी लावेन, असं प्रीती म्हणाली होती. 

टॅग्स :प्रीती झिंटासेलिब्रिटी