Join us  

...म्हणून मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना सर्वांसमोर थापड मारली होती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:55 PM

एकेकाळी त्यांची क्रेझ अशी होती की, ते  ज्या गाडीतून जात होते ती गाडी गेल्यावर खालची धूळही लोक उचलत होते. स्टुडिओमध्ये त्यांच्या कारला तरूणी किस करत होत्या.

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज जयंती. राजेश खन्ना यांचा जन्म १९४२ मध्ये पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता. भारतीय सिनेमाचा पहिला सुपरस्टार असं बिरूद त्यांना लावण्यात आलं होतं. इतकी त्यांची लोकप्रियता होती. आपल्या जबरदस्त अभिनयासाठी त्यांना तीनदा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. या पुरस्कारांसाठी ते १४ वेळा नॉमिनेट झाले होते. १८ जुलै २०१२ ला ते या विश्वातून गेले. पण त्यांचे काही किस्से आजही चर्चेत असतात. असेच काही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रक्ताने पत्र लिहित होत्या तरूणी

एकेकाळी त्यांची क्रेझ अशी होती की, ते  ज्या गाडीतून जात होते ती गाडी गेल्यावर खालची धूळही लोक उचलत होते. स्टुडिओमध्ये त्यांच्या कारला तरूणी किस करत होत्या. काही मुली तर त्यांना रक्ताने पत्रंही लिहित होत्या. ही एक वेगळ्या लेव्हलची क्रेझ होती. इतकी क्रेझ कधीच बघण्यात आली नव्हती. यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते.

महमूद यांनी वाजवली होती कानशीलात

अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मेहमूद हे एक 'जनता हवलदार' नावाचा सिनेमा करत होते. यात त्यांनी राजेश खन्ना यांना कास्ट केलं होतं. एक दिवस मेहमूद त्यांच्या फार्म हाउसवर सिनेमाचं शूटींग करत होते. तिथे मेहमूद यांचा मुलगा राजेश खन्ना यांना भेटला आणि हाय-हेलो करून सरळ निघून गेला. राजेश खन्ना याने नाराज झाले होते. तो फक्त त्यांना हेलो करून कसा गेला याचा त्यांना राग आला होता.  त्यानंतर राजेश खन्ना सेटवर उशीरा येऊ लागले होते.

रोज शूटींगला उशीरा येत असल्याने मेहमूद यांना राजेश खन्नाचा राग आला होता. ते सिनेमाचे दिग्दर्शकही होते आणि अभिनेतेही. एक दिवस त्यांनी सर्वांसमोर राजेश खन्ना यांना एक कानशीलात लगावली होती. ते राजेश खन्ना यांना म्हणाले होते की, 'तुम्ही सुपरस्टार असाल तुमच्या घरी, मी सिनेमासाठी तुम्हाला पूर्ण पैसे दिले आहेत. तुम्हाला माझा सिनेमा वेळेवर पूर्ण करावा लागेल'.

टॅग्स :राजेश खन्नामेहमूदबॉलिवूडइंटरेस्टींग फॅक्ट्स