Join us  

Saif Ali Khanच्या आधी 12 वर्षे मोठ्या विनोद खन्नाच्या प्रेमात वेडी झाली होती अमृता सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 6:48 PM

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. सैफआधी अमृताचे नाव अनेकांशी जोडले गेले होते..

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली.आज भलेही सैफ अली खान (Saif Ali Khan) ची पहिली बायको म्हणून अमृता सिंग (Amrita Singh) ला ओळखले जाते. पण त्याआधी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अशीही तिची ओळख होती आणि आहे. सैफआधी अमृताचे नाव अनेकांशी जोडले गेले होते..अमृताच्या आयुष्यात सैफ (Saif Ali Khan) आधी तीन पुरूष होते. या तिघांसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. एकासोबत तर तिचा साखरपुडाही झाला होता असे म्हणतात.

1983 साली अमृता (Amrita Singh) चा पहिला सिनेमा ‘बेताब’ रिलीज झाला. यात तिचा हिरो होता सनी देओल. पहिलाच सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1984 साली अमृताचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला. ‘सनी’ नावाच्या या सिनेमातही तिचा हिरो होता सनी देओल. पहिल्या सिनेमानंतरच अमृता व सनीच्या लव्ह अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अमृता सनीच्या प्रेमात वेडी होती. पण सनी आधीच विवाहित होता. ही गोष्ट त्याने अमृतापासून लपवून ठेवली होती. या कारणाने पुढे दोघांचे ब्रेकअप झाले. 

सनी देओलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृताच्या आयुष्यात एन्ट्री झाली ती एका क्रिकेटपटूची. सनीनंतर अमृता भारतीय क्रिकेटसंघाचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या प्रेमात पडली. 80 च्या दशकात या लव्हअफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पुढे रवी शास्त्रीच्या मॅच पाहायला अमृता मैदानावरही दिसू लागली होती. दोघांनी आपले नाते कधीच जाहिरपणे मान्य केले नाही. पण 1986 साली दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी आली. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि हे नातेही संपले.

अमृता व रवी शास्त्रीचा कथित साखरपुडा मोडला, यामागे अभिनेता विनोद खन्ना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. होय, रवी शास्त्रीला डेट करत असतानाच एक दिवस अमृता मस्करीत असे काही बोलून बसली की, रवी शास्त्रीसोबतचे तिचे नाते संपुष्टात आले. माझे लवकरच विनोद खन्नासोबत अफेअर सुरु होणार आहे, असे अमृता म्हणाली होती आणि तिच्या या वाक्याने रवी शास्त्रींचा राग अनावर झाला होता. पण, या वृत्ताला दुजोरा देणारे पुरावे नाहीत.

तू लाख प्रयत्न कर पण तुला विनोद खन्ना कधीच मिळणार नाही, असे रागारागात रवी शास्त्रीने अमृताला सुनावले होते. रवी शास्त्रीची हे शब्द अमृताने चॅलेंज म्हणून स्वीकारले होते. यानंतर संधी मिळेल तशी ती विनोद खन्नासोबत फ्लर्ट करू लागली.

सुरुवातीला विनोद खन्ना यांनी मनावर घेतले नाही. पण पुढे तेही अमृताच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते. पण विनोद खन्ना अमृतापेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. असे म्हणतात की, दोघांच्या अफेअरची चर्चा अमृताच्या आईच्या कानावर गेल्यावर तिने या नात्याला कडाडून विरोध केला आणि याचमुळे हे नाते संपुष्टात आले.

विनोद खन्नानंतर अमृताच्या आयुष्यात आला तो सैफ अली खान. तीनदा प्रेमात अपयशी ठरलेल्या अमृताला 12 वर्षे लहान सैफ असा काही भावला की, कुटुंबाचा विरोध पत्करून तिने त्याच्याशी लग्न केले. अर्थात लग्नानंतर 13 वर्षांनी हे नातेही संपुष्टात आले. 

टॅग्स :अमृता सिंगसैफ अली खान विनोद खन्ना