Join us  

पद्म पुरस्कार देण्यासारखं अनुपम खेरनं काय केलय?- कादर खान

By admin | Published: January 30, 2016 8:51 PM

केंद्र सरकारकडून देण्यात येणारा मानाचा पद्म पुरस्कार दोन दिवसांपूर्वी अभिनेता अनुपम खेर यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या या पुरस्कारावर अभिनेता कादर खान यांनी प्रश्नचिन्ह

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - केंद्र सरकारकडून देण्यात येणारा मानाचा पद्म पुरस्कार दोन दिवसांपूर्वी अभिनेता अनुपम खेर यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या या पुरस्कारावर अभिनेता कादर खान यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेप घेतला आहे. 
अभिनेता कादर खान म्हणाले की, अनुपम खेरनं पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करण्याव्यतिरिक्त काय केलं आहे, की त्याला पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्कार मला मिळाला नाही ते एक बरं झालं. कधीच मी कोणाच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही आणि करणारही नाही. फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांना फक्त अशाच कारणांमुळे पद्म पुरस्कार दिला जात असेल तर  असा पुरस्कार मला नकोच. पुरस्कार मिळणे ही काही मोठी गोष्ट नाही पण, तो कोणाला दिला जात आहे, या गोष्टीवर त्याचे महत्त्व अवलंबून असतं. 
यावर्षी या पुरस्कारासाठी ज्या नावांची घोषणा करण्यात आली आहे त्यांच्याइतका मी सक्षम नाही असं मला वाटतं. मात्र,ज्यांनी पद्म पुरस्कारासाठी माझे नाव सुचविलं होतं, त्या सर्वांचा मी आभारी आहे.