Join us

खलनायकांची मुलं काय करत आहेत सध्या ?

By admin | Updated: March 6, 2017 03:04 IST

सिनेमातील अभिनेता आणि अभिनेत्री रसिकांचे फेव्हरेट असतात.

सुवर्णा जैनसिनेमातील अभिनेता आणि अभिनेत्री रसिकांचे फेव्हरेट असतात. त्यांच्यातील रोमान्स, डान्स, प्रेम सारे काही रसिकांना भावते. त्यामुळे सिनेमात अभिनेता आणि अभिनेत्रीचे स्थान हे खास असते. मात्र, या अभिनेता आणि अभिनेत्रींच्या रोमान्समध्ये विघ्न आणतो तो खलनायक. या नायक-नायिकेच्या आयुष्यात लुडबुड करणारा खलनायक रसिकांच्या डोक्यात जातो. याला काही माणुसकी आहे की नाही असेही बऱ्याचदा ऐकायला मिळते. मात्र, तीच त्या खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या अभिनयातील ताकद असते. हिंदी चित्रपटसृष्टीतही असे अनेक खलनायक आहेत की, ज्यांचे नाव ऐकूनच भल्या-भल्यांना धडकी भरते. त्यांचा आवाज, दमदार अभिनय यांमुळे त्यांनी खलनायकाची भूमिका साकारत असतानाही रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविले आहे. खलनायक म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांनी नवी उंची गाठली आहे. मात्र, खलनायकी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचं रिअल लाइफ जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असतेच. त्यामुळे आम्ही तुमची भेट घडवून देणार आहोत या दिग्गज खलनायकांच्या रिअल लाइफ पुत्रांशी.अमरीश पुरी-राजीव पुरी‘मोगँबो खुश हुआ’ हा डायलॉग ऐकलं की डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आणि खलनायकाच्या भूमिकेला नवं परिमाण मिळवून देणारे अभिनेता अमरिश पुरी यांचा. आपला पहाडी आणि दमदार आवाज, तितकाच खास अभिनय याच्या जोरावर अमरीश पुरी यांनी अनेक खलनायकी भूमिका अजरामर केल्या आहेत. अमरीश पुरी यांचे पुत्र काय करतात, असा सवाल प्रत्येकाच्या मनात असेल. त्यांच्या मुलाचे नाव राजीव पुरी असं आहे. राजीव हे चित्रपटसृष्टीत नसले, तरी उद्योगपती म्हणून त्यांनी नाव कमावलं आहे.अमजद खान-शादाब खानकितने आदमी थे... शोले सिनेमातील गब्बर अर्थात अमजद खान यांनी खलनायक म्हणून रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवले आहे. त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शादाबने बॉलिवूडमध्ये एंट्री मारली. ‘राजा की आयेगी बारात’ हा त्याचा पहिला सिनेमा. मात्र, या सिनेमाला आणि पर्यायाने शादाबच्या फिल्मी करियरला अमजद खान यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळू शकली नाही.नसिरुद्धीन शाह-विवान शाहअभिनेता नसिरुद्धीन शाह यांनी अनेक खलनायकी भूमिका गाजवल्या आहेत. प्रत्येक भूमिकेला नसिरुद्धीन शाह यांनी दमदार अभिनयाने पुरेपूर न्याय दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा लेक विवान यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. ‘हॅप्पी न्यू इयर’ या सिनेमात विवान बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत रूपेरी पडद्यावर झळकला होता.किरण कुमार-विकास कुमारअभिनेता किरण कुमार यांनी विविध सिनेमात खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे. किरण कुमार यांच्याप्रमाणेच त्यांचा लेक विकास कुमार यानेही अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका सीआयडीमध्ये विकास कुमार याने सीआयडी आॅफिसरची भूमिका साकारली होती. याशिवाय विविध मालिकांमध्येही तो झळकला आहे.शक्ती कपूर-सिद्धार्थ कपूरबॉलिवूडचा क्राईम मास्टर गो-गो म्हणजेच अभिनेता शक्ती कपूर. त्यांनी साकारलेल्या विविध खलनायकी भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. शक्ती कपूर यांच्या अभिनयाचा वारसा आता त्यांचा लेक सिद्धार्थ कपूर चालवतो आहे. बॉलिवूडच्या नव्या उगवत्या ताऱ्यांमध्ये सिद्धार्थची गणना होते. अनुपम खेर-सिकंदर खेरडॉक्टर डँग हा प्रत्येक सिनेप्रेमी रसिकाला लक्षात असेल. सशक्त अभिनयामुळे अभिनेता आणि खलनायक म्हणून डॉक्टर डँगची भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातील त्यांच्या खलनायकी भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजही अनुपम खेर यांच्यातील कलाकार विविधरंगी भूमिका साकारत रसिकांचं मनोरंजन करत आहे. अनुपम खेर यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकाने अर्थात सिकंदर खेर यानेही अभिनयात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. नुकतंच 24 सिरीजच्या सीझन टू मध्ये सिकंदर खेर वडील अनुपम खेर यांच्यासोबत झळकला आहे.गुलशन ग्रोव्हर-संजय ग्रोव्हरबॉलिवूडचा बॅड मॅन कोण असं म्हटलं की रसिकांच्या ओठावर एकच नाव येते ते म्हणजे गुलशन ग्रोव्हर. गेली अनेक दशकं खलनायकी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. गुलशन ग्रोव्हर यांनी आपला लेक संजय ग्रोव्हरला मात्र बॉलिवूड आणि अभिनयापासून दूर ठेवले आहे. संजय हा प्रोग्रॅमिंग एंड बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डायरेक्टर आहे.