Join us  

Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकर साकारणार 'सेक्स वर्कर'ची भूमिका; आलिया भटशी होतेय तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:00 AM

'मिर्झापूर' फेम अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने वेबसिरीज मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख बनवली आहे. आता श्रिया आणखी एक आव्हान पेलायला सज्ज आहे.

Shriya Pilgaonkar : 'मिर्झापूर' (Mirzapur) फेम अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने वेबसिरीज मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) आपली वेगळी ओळख बनवली आहे. श्रिया प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची लेक आहे. हीच ओळख न राहता  तिने अभिनयात आपला वेगळा ठसा उमटवून दाखवला आहे. आता श्रिया आणखी एक आव्हान पेलायला सज्ज आहे. आगामी वेबसिरीजमध्ये श्रिया वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारणार आहे. 

ताजा खबर नवी वेब सिरीज

हॉटस्टार वरील ताजा खबर (Taaza Khabar) या नव्या वेबसिरीज मधून ती पुन्हा आपला अप्रतिम अभिनय सादर करणार आहे. यामध्ये श्रियाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भुमिका साकारली आहे. ताजा खबर सिरीज चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. तिच्यासाठी ही आतापर्यंतची सर्वात भूमिका असणार हे नक्की. ट्रेलर पाहून चाहत्यांनी श्रियाची तुलना आलिया भटशी केली आहे. आलियाने नुकतीच गंगुबाई काठियावाडी सिनेमात सेक्स वर्करची भूमिका साकारली होती ज्याचे प्रचंड कौतुकही झाले होते.

सेक्सवर्करच्या भूमिकेवर श्रिया काय म्हणाली ?

श्रिया सांगते, 'ताजा खबर वेबसिरीज माझ्यासाठी खूप खास आहे. कारण यामध्ये मी कधीही न केलेली भूमिका साकारत आहे. त्यामुळे सेक्स वर्करची भूमिका करायचा अनुभव वेगळाच आहे.'

'ताजा खबर' ही वेबसिरीज डिझ्नी प्लस हॉटस्टारवर ६ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सीरिजमध्ये फेमस युट्युबर भुवन बाम, मराठमोळा कलाकार प्रथमेश परब, नित्या माथूर अतिशा नाईक यांचीही भूमिका आहे. 

टॅग्स :वेबसीरिजश्रिया पिळगावकरसचिन पिळगांवकरमिर्झापूर वेबसीरिज