Join us

'मेड इन हेवेन सीझन २'मध्ये झाली मोना सिंगची एन्ट्री, या दिवशी OTT वर येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 18:43 IST

Made In Heaven : 'मेड इन हेवन' या लोकप्रिय वेब सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये प्रदर्शित झाला.

'मेड इन हेवन' या लोकप्रिय वेब सीरिजचा पहिला सीझन २०१९ मध्ये प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना तो खूप आवडला. आता चाहते सीझन २च्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, निर्मात्या झोया अख्तरने या बहुचर्चित शोच्या दुसऱ्या सीझनची अधिकृत घोषणा केली होती. आता लेटेस्ट अपडेटनुसार ही सीरिज कोणत्या तारखेला रिलीज होणार हे जाहीर करण्यात आले आहे.

'मेड इन हेवन' सीरिजचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केले आहे. या सीरिजची निर्मिती झोयाचा भाऊ आणि अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश साधवानी यांच्या एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंटने झोया आणि रीमा यांच्या टायगर बेबी प्रॉडक्शन हाऊसच्या सहकार्याने केली आहे. तारीख जाहीर करताना फरहान अख्तरने सोशल मीडियावर लिहिले, 'तारीख लक्षात ठेवा... मेड इन हेवन सीझन २, १० ऑगस्ट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर.'

दिल्लीच्या पार्श्‍वभूमीवर, या शोमध्ये शहरात आयोजित भारतीय विवाहसोहळ्यांची भव्यता अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. या मालिकेसाठी अभिनेत्री शोभिता धुलिपालाचे खूप कौतुक झाले आणि आता तिच्यासोबत मोना सिंग आणि इश्वाक सिंग हे देखील नवीन कलाकार म्हणून दिसणार आहेत. याविषयी झोया अख्तर आणि रीमा कागती म्हणाल्या की, मेड इन हेवनला आपल्या हृदयात एक खास स्थान आहे, कारण यात अनेक क्रिएटिव्ह लोकांनी एकत्र काम केले आहे. या मालिकेतील ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे.