Join us  

निराला बाबा पुन्हा येत आहेत! बॉबी देओलच्या 'आश्रम'चा चौथा सीझन या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:35 PM

बॉबी देओलच्या 'आश्रम'चा नवीन सिझन या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला. सीरीजमधल्या कलाकारानेच केला खुलासा

अभिनेता बॉबी देओल सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. बॉबीने २०२३ च्या अखेरीस 'अॅनिमल' सिनेमात खलनायकाची भूमिका साकारुन चांगलीच वाहवा मिळवली. बॉबी देओलकडे आता एकामागून एक सिनेमांची ऑफर आहे. अशातच OTT वर गाजलेल्या बॉबी देओलच्या 'आश्रम'चा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आश्रम'मधील कलाकार चंदन रॉय यांनीच याविषयी खुलासा केलाय. 

'आश्रम' सिरीजमधील भोपा स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता चंदन रॉय याविषयी खुलासा करत म्हणाला, "प्रत्येकजण त्याला 'आश्रम'च्या चौथ्या सीझनबद्दल विचारत असतो. मला वाटतं की यावर्षी लोक हे विचारणं थांबवतील. कारण सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सध्या स्क्रीप्टींगवर काम सुरु असून शूटिंगचा काही भाग बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. असं जरी असलं तरी या वर्षी ही सीरीज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे."

'आश्रम' मध्ये  बॉबी देओल निराला बाबांच्या प्रमुख भूमिकेत झळकत आहे. याशिवाय त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर, इशा गुप्ता, अनुप्रिया गोयंका अशा कलाकारांच्या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. धर्माच्या नावाखाली बुवाबाजीचा भ्रष्ट कारभार, या सीरीजमधून पाहायला मिळतो. प्रकाश झा यांनी ही सीरीज बनवली. आता २०२४ ला 'आश्रम'चा पुढचा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

 

टॅग्स :बॉबी देओलवेबसीरिज