Join us  

कपिल शर्माच्या वैयक्तिक चेष्टेमुळे वैतागल्या अर्चना पूरन सिंह? म्हणाल्या, "त्याच्यात बदल नाहीच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:51 PM

कपिल प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाही.

कपिल शर्मा (Kapil Sharma) शो मध्ये अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) यांनी नवज्योत सिद्धूची जागा घेतली होती. तेव्हापासून कपिल प्रत्येक एपिसोडमध्ये अर्चना यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाही. काही वेळेस ही चेष्टा वैयक्तिक पातळीवर जाणारीही असते. कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' लवकरच नेटफ्लिक्सवर येतोय. सध्या शोची टीम जोरात प्रमोशन करत आहेत. यावेळी अर्चना पूरन सिंह यांनी दिलखुलास संवाद साधला. कपिलच्या खिल्ली उडवण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

अर्चना पूरन सिंह यांनी कपिल काही वर्षांपासून सोबत काम करत आहेत. त्यांच्यात आता छान कनेक्शन झालंय. यावर त्या म्हणाल्या, "बरं झालं तो अजूनही बदललेला नाही. आधीसारखीच कॉमेडी तो आजही करतोय आणि प्रेक्षकांना हसवतोय. आज तो ज्या लेव्हलवर काम करतोय ते पाहता त्याच्या कामाचा स्तर वाढतच जात आहे. याखेरीज काहीच बदललेलं नाही. त्याचा मूळ स्वभावच तो या व्यासपीठावर घेऊन आला आहे. तो छोट्या शहरातून आहे पण त्याचं मन खूप मोठं आहे. मी जितकं त्याला ओळखते त्याच्यात किंचितही बदल झालेला नाही."

कपिलच्या खिल्ली उडवणाऱ्यावर त्या म्हणाल्या, "तो माझी खूप चेष्टा करतो. आम्ही जेव्हा दुसऱ्या शोजमध्ये काम करत होतो तेव्हाही त्याने तेच केलं. पण आमच्यात एकमेकांबद्दल आदर आहे. त्यामुळे तणाव किंवा वाद होत नाहीत. हा त्याचा चांगला गुणधर्म आहे की सेटवर काहीही नकारात्मक नसतं. आमच्यात आधीसारखंच प्रेम, आदर आहे."

'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा शो' टीव्हीवर सुपरहिट झाला. आता शो ओटीटीवर येत आहे. ३० मार्च पासून नेटफ्लिक्सवर शो रिलीज होणार आहे. यामध्ये सुनील ग्रोवरने सर्व वाद विसरुन कमबॅक केलं आहे. शिवाय कृष्णा अभिषेक, राजीव ठाकुर, किकू शारदा ही मंडळीही आहेत. 

टॅग्स :अर्चना पूरण सिंगकपिल शर्मा नेटफ्लिक्स