Join us  

'राजकारणी पैसे खातात हे आपण मान्य केलं आहे...', अवधुत गुप्तेचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:22 PM

Avadhoot Gupte : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार, आणि निर्माता अवधूत गुप्ते सध्या चर्चेत आला आहे. यावेळी तो कोणत्या गाण्यामुळे नाही तर राजकारणावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार, आणि निर्माता अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या चर्चेत आला आहे. यावेळी तो कोणत्या गाण्यामुळे नाही तर राजकारणावर केलेल्या विधानामुळे चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत त्याने रिअॅलिटी शो, राजकारण, मतदान यावर भाष्य केले आहे.

अवधूत गुप्तेने अलिकडेच 'मित्र म्हणे' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.अवधुत गुप्ते म्हणाला की, आता मी कोणाबद्दल विशिष्ट असं बोलत नाही, पण हेच स्वतःच राजकारणी म्हणतात की राजकारणाचा स्तर खाली गेलाय. तो खाली गेलाय म्हणजे काय? की ज्या गोष्टींची राजकारण्यांना किंवा पूर्वीच्या समाजातल्या लोकांना ज्या गोष्टीची  लाज वाटायची किंवा ज्या गोष्टी पूर्णपणे स्वीकारत नव्हते. ते आता स्वीकारू लागले आहेत. आता मंत्री झाले म्हटल्यावर ते पैसे तर थोडे खाणार १० टक्के तर घेणार ते कामातले. ते घ्या पण बाकी ९० टक्के काम करा आणि आमच्याकडे पहिले करा, हे सामान्य माणूस बोलायला लागला आहे. एखादा नेता आहे किंवा मंत्री आहे, त्यांनी पैसे खाल्ले किंवा तो खातो. ही गोष्ट सामान्यतल्या सामान्याला मान्य झाली आहे. खरोखर मान्य झाली आहे. सिस्टीमचा भाग झालाय तो. 

ही सामान्य माणसाची चूक आहे...

पुढे तो म्हणाला की, आता हे जातीचं राजकारण असू दे किंवा हे सगळे असू दे. तर याला तुला काय वाटतं ते जबाबदार आहेत? ते नाही जबाबदार तर जबाबदार आपण आहोत. आपण सामान्य माणसं आहोत की जे प्रत्येकाला लायकीचे सरकार मिळते असे जे वाक्य म्हटलं आहे, ते तसे खरे आहे ना. लोक या राजकारण्यांना शिव्या देतात की तुम्ही जातीचे राजकारण केले, पण त्यासाठी ते किती दोषी आहेत. फक्त ५ टक्के दोषी आहेत, ९५ टक्के दोषी तर आपण आहोत.  त्यांना व्होटबँक हा शब्द कोणी दिला. ते अमुक जातीची व्होटबँक, तमुक जातीची व्होटबँक असे म्हणतात. ७५ वर्षे झालीत तरी आजही व्होटबँक अस्तित्वात आहेत, ही सामान्य माणसाची चूक आहे.  

टॅग्स :अवधुत गुप्ते