Join us

‘आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो!’

By admin | Updated: July 1, 2017 03:11 IST

छोट्या पडद्यावरील सुपरस्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहियाच्या जोडीने एका टीव्ही शोकडून मानाचा किताब मिळवला आहे.

छोट्या पडद्यावरील सुपरस्टार दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहियाच्या जोडीने एका टीव्ही शोकडून मानाचा किताब मिळवला आहे. सनाया इरानी- मोहित सेहगल आणि सनल-अबीगेल या दोन जोड्यांना मागे टाकत दिव्यांका आणि विवेकने त्यांना मिळालेल्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयानंतर दिव्यांका व विवेकने लोकमत-सीएनएक्स मस्तीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो, असे दिव्यांका व विवेकने यावेळी सांगितले.हा किताब जिंकल्यानंतर कसे वाटतेय? असा प्रश्न दिव्यांका आणि विवेक या दोघांना केला असता, दोघांनाही अगदी आनंदात जल्लोष केला. आम्ही खूप आनंदात आहोत. आम्हाला जिंकायचेच होते आणि आम्ही जिंकलो. त्यासाठी अफाट मेहनत घेतली. समोर ती ट्रॉफी दिसायची तेव्हा ही घरी न्यायचीच, या एकाच विचाराने मला ग्रासले होते आणि आता ही ट्रॉफी आमच्या समोर आहे. आमच्या हातात आहे, असे दिव्यांका म्हणाली.तुम्हा दोघांना या विजयाच्या मुक्कामाला पोहोचवणारी एक अशी कुठली गोष्ट होती, असे तुम्हाला वाटते? यावर दिव्यांका व विवेक दोघांचेही उत्तर एकच होते. ते म्हणजे, प्रचंड जीवतोड मेहनत. दिव्यांका व मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सुरुवातीला हेल्थ प्रॉब्लेम्स आलेत. पण आम्ही सगळ्यांवर मात केली. भूक, तहान, झोप असे सगळे विसरून आम्ही प्रॅक्टिस केली. या मेहनतीचे फळ मला व दिव्यांकाला मिळाले, असे विवेक म्हणाला.हा विजय कसा सेलिब्रेट करणार आहात? या प्रश्नावर तर दोघांचीही कळी खुलली. आमची फॅमिली आमच्यासोबत आहे. आम्ही आता मज्जा करणार आहोत. याशिवाय मस्तपैकी ताणून झोप काढणार आहोत, असे दिव्यांकाने सांगितले.या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा अनुभव एका वाक्यात सांगायचा झाल्यास कसा सांगणार, यावर दिव्यांका फुल्ल रोमँटिक झाली. रोमँटिक गाण्यांवर डान्स करता करता रोमान्स आणखी वाढला, असे दिव्यांका म्हणाली. विवेकने तर यावर अगदी सिक्सर मारला. माझ्या परफेक्ट बायकोत मला एक इम्परफेक्ट बायको सापडली आणि माझे तिच्यावरचे प्रेम आणखी वाढले, असे तो म्हणाला. यावेळी दिव्यांका व विवेक दोघांनीही चाहत्यांचे मनापासून आभार मानले. आजचा हा विजय खऱ्या अर्थाने आमच्या चाहत्यांचा विजय आहे. त्यांचे प्रेम आणि लोभ यामुळे आम्ही हे सीझन जिंकू शकलो. यापुढेही चाहत्यांचे असे प्रेम आम्हाला मिळो, असे दोघेही म्हणाले. यापुढे कुठलाही रिअ‍ॅलिटी शो करण्याचा प्लॅन नाहीयं, हे सांगायलाही दोघे विसरले नाहीत.