Join us

करिनाला शिकायचे भरतनाट्यम्

By admin | Updated: September 3, 2015 03:35 IST

बॉ लीवूडची ‘बेबो’ करिना कपूर म्हणते की, शास्त्रीय नृत्य शिकणे तिचे लहानपणाचे स्वप्न आहे. मात्र, सध्याच्या तिच्या अतिव्यस्त वेळापत्रकामुळे तिला हे शक्य नाही.

बॉ लीवूडची ‘बेबो’ करिना कपूर म्हणते की, शास्त्रीय नृत्य शिकणे तिचे लहानपणाचे स्वप्न आहे. मात्र, सध्याच्या तिच्या अतिव्यस्त वेळापत्रकामुळे तिला हे शक्य नाही. तरीदेखील ती म्हणते की, लवकरच भरतनाट्यमचे रीतसर प्रशिक्षण घेण्याचा विचार करीत आहे. तिची मोठी बहीण करिश्माने शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. ती सराव करत असताना करिना तिच्या स्टेप्सची आरशात पाहून नक्कल करायची. आता करिनाचा असा मूड का झाला हे सांगणे शक्य नाही. मात्र, यामुळे तिचे चाहते नक्कीच खूश होतील यात शंका नाही. करिनाला पारंपरिक कपडे घालायलासुद्धा खूप आवडते. साडी, अनारकली ड्रेस तिचे फेव्हरेट आहेत. तिच्यासाठी फॅशन म्हणजे आरामदायी कपडे, ज्यात तिला आत्मविश्वास वाटेल.