Join us

श्रद्धाची ‘लपाछपी’

By admin | Updated: January 16, 2015 00:10 IST

भूमिकेत रंग भरण्यासाठी आजकालचे स्टार्स काहीही करायला तयार असतात. आता श्रद्धा कपूरच घ्या.

भूमिकेत रंग भरण्यासाठी आजकालचे स्टार्स काहीही करायला तयार असतात. आता श्रद्धा कपूरच घ्या. रेमो डिसोझाच्या ‘एबीसीडी २’ या नव्या चित्रपटासाठी श्रद्धाने आपल्या मानेवर एक टॅटू काढून घेतलाय. त्यामुळे मीडियासमोर वावरताना श्रद्धा बरीच काळजी घेताना दिसतेय. चित्रपट रिलीज होईपर्यंत हा टॅटू कोणालाही न दाखवण्याची सूचनाच तिला आहे. त्यामुळे श्रद्धाच्या मानेवरचा टॅटू नक्की आहे तरी कसला याचं जोरदार गॉसिप सध्या ‘बी-टाऊन’मध्ये गाजतंय.