Join us  

Viral Video: श्रद्धा कपूरच्या ओठी मराठीचा गोडवा, फॅन्सही मराठी बाण्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 4:13 PM

नेटीझन्सना श्रद्धाचा हा लूकही खूप आवडला आहे. यांत तिने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला असून या ड्रेसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत आहे.

श्रद्धा कपूर सध्या  आगामी 'साहो'  'छिछोरे' या दोन्ही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  त्यात 'साहो' 30 ऑगस्टला प्रदर्शित होणार तर  'छिछोरे' 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.  दोन्ही सिनेमांमध्ये श्रद्धा मुख्य भूमिकेत आहे.  'साहो' सिनेमात  प्रभाससह ती झळकणार तर  'छिछोरे' सिनेमात सुशांत सिंह राजपूतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या वेगवेगळ्या प्रमोशनमधले व्हिडीओ फोटोंमध्ये श्रद्धा पाहायला मिळत असताना आता तिचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत श्रद्धा मीडियाच्या फोटोग्राफर्ससोबत मराठी भाषेत बोलताना पाहायला मिळत आहे. श्रद्धाला मराठीत बोलताना पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तिचा हा मराणी बाणा सा-यांनाच आवडलेला असून तिचे खूप कौतुकही करत आहेत. तसेच नेटीझन्सना श्रद्धाचा हा लूकही खूप आवडला आहे. यांत तिने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला असून या ड्रेसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत आहे. 

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धाने सांगितले होते की, सगळ्यात आधी तर मी महाराष्ट्रीयन आहे. माझी आई मराठी आहे त्यामुळे माझ्यावर सगळे महाराष्ट्रीयन आणि मराठी संस्कार झालेत. बोलायचं झाले तर अर्धी पंजाबी आणि अर्धी मराठी अशी मी आहे. मात्र माझं बालपण सगळं मराठी वातावरणात गेलंय. त्यामुळे मराठी माझ्या खूप जवळ आहे. त्यात माझे आजी-आजोबा आमच्या इमारतीतच राहत असल्यामुळे त्यांच्यासोबत बराच काळ मी घालवला आहे. त्यामुळे लहानाची मोठी मी या मराठी वातावरणातच झाले. म्हणून मी स्वतःला मराठी मुलगी समजते.

तसेच पुढे म्हणाली की, खरं सांगायचा तर मी मराठी सिनेमा पाहिलेला नाही. मात्र मराठी सिनेमाबद्दल जेवढं ऐकलंय त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मराठी सिनेमा पाहाण्याची इच्छा आहे. खूप वर्षांपासून मी मराठी सिनेमा पाहिलेला नाही.

बहुदा 'चिमणी पाखरं' हा सिनेमा मी पाहिला होता. मात्र मराठी सिनेमातील शब्द मला कितपत समजतील असंही वाटतं. तरीही मी लवकरच एखादा मराठी सिनेमा पाहणार आहे. मराठीत नक्कीच काम करायला आवडेल. माझ्यासाठी नक्कीच ती आनंदाची बाब असेल. एखादी चांगली स्क्रीप्ट आणि कथा आली तर नक्कीच मी मराठी सिनेमात काम करेल.

टॅग्स :श्रद्धा कपूरसाहो