Join us

विनीतकुमार दुसरा देवदास

By admin | Updated: January 5, 2015 00:00 IST

‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘गँग्स आॅफ वासेपुर’नंतर अनुराग कश्यप यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अग्ली’ या चित्रपटात विनीतकुमार सिंगने महत्त्वाची भूमिका साकारली

‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘गँग्स आॅफ वासेपुर’नंतर अनुराग कश्यप यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अग्ली’ या चित्रपटात विनीतकुमार सिंगने महत्त्वाची भूमिका साकारली. त्यांनतर तो आता अनोख्या भूमिकेसाठी सज्ज झाला असून, ‘और देवदास’ या हिंदी चित्रपटात तो दुसऱ्या देवदासच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे पारोला देवदासव्यतिरिक्त आणखी एक प्रियकर आहे, असे दाखविण्यात येणार आहे. पारोची प्रमुख व्यक्तिरेखा रिचा चढ्ढा साकारत असून, देवदासच्या भूमिकेत राहुल भट तर पारोच्या दुसऱ्या प्रियकराच्या भूमिकेत विनीतकुमार सिंग झळकणार आहे.