Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते?'मधील विमल खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 07:00 IST

आई कुठे काय करते मालिकेतील विमल म्हणजेच अभिनेत्री सीमा घोगळे हिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते?'ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आई, आप्पा, अनिरुद्ध, अरूंधती, अभिषेक, ईशा, यश या सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या पात्रांशिवाय संजना, शेखर, गौरी आणि विमल यांच्या भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप भावल्या आहेत. या मालिकेत अरुंधतीच्या मदतीला नेहमी धावून येणारी ओन्ली विमलने तिच्या कोकणी भाषेतील संवादाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विमलची भूमिका साकारते आहे अभिनेत्री सीमा घोगळे.

आई कुठे काय करते मालिकेतील विमल म्हणजेच अभिनेत्री सीमा घोगळे हिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. सीमा अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगना आहे. तिने मालिकेशिवाय नाटक आणि चित्रपटातही काम केले आहे.

सीमा घोगळे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती आई कुठे काय करते मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरेसोबत डान्सचे व्हिडीओ बनवत असते आणि सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्या डान्स व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. 

आई कुठे काय करते मालिकेने नुकतेच ४०० भाग पूर्ण केले आहेत. सध्या मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. अंकिताचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान आता लवकरच अरूंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट होणार आहे. दुसरीकडे संजना अरूंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटामुळे खूप खूश असून सध्या ती लग्नाची तयारी करताना दिसते आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह