Join us  

पापाराझीवर चांगलाच संतापला विजय वर्मा, म्हणाला, "जेव्हापासून तमन्नाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 6:03 PM

Vijay Varma : अभिनेता विजय वर्मा त्याच्या दमदार अभिनयासोबत सध्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत असल्यामुळे खूप चर्चेत आहे.

अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) त्याच्या दमदार अभिनयासोबत सध्या अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamannah Bhatia)ला डेट करत असल्यामुळे खूप चर्चेत आहे. तो तमन्नासोबत जिथे कुठे जातो तिथे त्याच्यामागे पापाराझी लागतात. विजयने पापाराझी कल्चरवर आपलं मत मांडलं आहे. विजय म्हणाला की, जेव्हा तो तमन्नाला डेट करत नव्हता तेव्हा तो पापाराझींना खूप छान रित्या हॅण्डल करत होता. मात्र त्यानंतर सगळं काही बिघडले. पापाराझींचे डोकं खराब झालं आहे.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये विजय वर्मा म्हणाला की, मी त्यांना आधी चांगले डेट करत होतो पण जेव्हा मी तमन्ना भाटियाला डेट करायला सुरुवात केली तेव्हा या पापाराझींनी मला अधिक फॉलो करायला सुरुवात केली. त्यानंतर हे लोक वेडे झाले. मी त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. बरेचदा असे झाले की ते माझ्या घराच्या दारात आलेत. माझ्या इमारतीत यापूर्वी कोणीही आले नव्हते पण जेव्हा हे घडले तेव्हा मी त्यांना माझ्या वैयक्तिक जागेत येऊ नका असे सांगितले. ही मर्यादा ओलांडू नका. मी अंधेरीत राहतो हे कोणालाही कळू नये. माझे घर कुठे आहे हे तुमच्या मित्रांना सांगू नका आणि माझ्या घराबाहेर उभे राहू नका. मला पापाराझींशी बोलायला आवडते पण ते माझे मित्र नाहीत.

कोणतेच खासगी प्रश्न विचारण्याची परवानगी नाही...विजय पुढे म्हणाला की, ते पर्सनल प्रश्न विचारु शकत नाहीत. ते पत्रकार नाहीत आणि त्यांना माझ्या परवानगीशिवाय कोणतेच खासगी प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. याच वर्षी तमन्नाने एका मुलाखतीत विजयला डेट करत असल्याचे कबूल केले होते. सर्वात आधी दोघांचा न्यू इअर सेलिब्रेशन दरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात ते दोघे किस करताना दिसले होते. दोघे नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज २मध्ये एकत्र काम करताना दिसले होते.

टॅग्स :तमन्ना भाटिया