ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12- अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यासिनेमाबद्दल फक्त प्रेक्षकांनाच उत्सुकता नव्हती, तर या सिनेमाच नाव ऐकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरही हसू आलं होतं. त्यांनासुद्धा या सिनेमाविषयीची उत्सुकता आहे. स्वच्छता, शौचालयं याभोवती सिनेमाचं कथानक नेमकं कसं फिरणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची ही उत्सुकता थोडी कमी केली आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये सामाजिक संदेश देणारा आणि त्याला मनोरंनाची जोड बघायला मिळते आहे.. या सिनेमामध्ये अक्षयला एका सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे ट्रेलरमधून अक्षय प्रेक्षकांची कनेक्ट होतो आहे. त्याशिवाय शौचालय आणि त्याच्याभोवची फिरणारं कथानक हाताळताना विनोदी शैलीतून काही महत्त्वाचे संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. घरामध्ये शौचालय नसल्यामुळे अक्षय आणि भूमीच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो. इथून खरंतर सिनेमाचा प्रवास सुरू होतो आणि हळुहळू हा सिनेमा प्रमुख मुद्द्यावर कसा जाणार याची झलक ट्रेलकमध्ये दिसते आहे.
सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्यापुर्वी अक्षय़ कुमारने सिनेमाच्या प्रमोशनला सुरूवात केली आहे. विविध पोस्टर्स आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून हा सिनेमा प्रेक्षकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गेल्या वर्षभरात अक्कीच्या सिनेमांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता त्याचा नवा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजण्यासाठी सज्ज होतो आहे. या सिनेमात अभिनेत्री भूमी पेडणेकर अक्षयसोबत स्क्रीन शेअर करते आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि भूमीची नवी जोडी सिनेमातून प्रेक्षकांना भेटणार आहे.
दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांचा हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.. आता अक्षय-भूमीचा टॉयलेट : एक प्रेमकथा प्रेक्षकांना कसा वाटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
A love that started a revolution! Here's the #ToiletEkPremKathaTrailer@ToiletTheFilm@psbhumihttps://t.co/6XAnZgBTEa— Akshay Kumar (@akshaykumar) June 11, 2017