Join us

VIDEO- असा आहे करिनाचा पोस्ट प्रेग्नन्सी वर्कआऊट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2023 16:01 IST

अभिनेत्री करिना कपूरने प्रसुतीनंतर अवघ्या तीन महिन्यात वाढलेलं वजन घटवलं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30-  अभिनेत्री करिना कपूर तीच्या फिटनेसमुळे सिनेवर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय असते. तीच्या साइज झिरोबद्दल आजसुद्धा बोललं जातं आहे. गरोदर असताना करिना कपूर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत होती. पण याबरोबर तीच्या वाढलेल्या वजनाबद्दलसुद्धा चर्चा झाली. पण करिनाने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. प्रसुतीनंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये तीने वाढलेलं वजन कमी केलं आहे. त्यासाठी कठोर मेहनत करिनाने घेते आहे. जीम आणि योगा करून वजन नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सध्या बेबोचे सुरू आहेत.
करिनाची आणि तीची खास मैत्रिण अमृता अरोरा दोघीही मिळून जीममध्ये जाताता. जीममधील वर्कआऊटचा व्हिडीओ अमृताने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये या दोघी हेव्ही वर्कआऊट करताना दिसत आहेत.