Join us

VIDEO : बाहुबली प्रभासच्या "साहो"चा टीझर रिलीज

By admin | Updated: April 28, 2017 17:32 IST

"बाहुबली 2 द कन्ल्क्युजन" या सिनेमामुळे सध्या देशभरात चर्चेत असलेला अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा "साहो"चं टीझरही रिलीज करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - "बाहुबली 2 द कन्ल्क्युजन" या सिनेमामुळे सध्या देशभरात चर्चेत असलेला अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा "साहो"चं टीझरही रिलीज करण्यात आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, "साहो; सिनेमाचं टीझर "बाहुबली 2" सिनेमाच्या प्रदर्शनावेळीच  रिलीज करण्यात येणार होते. मात्र सोशल मीडियावर टीझर लीक होण्याच्या भीतीपोटी "साहो"ची पहिली झलक प्रेक्षकांसाठी रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
टीझर तेलुगू आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान, या सिनेमामध्ये प्रभासचा अंदाज आणि भूमिका "बाहुबली 2" सिनेमाहून अनोखा आहे. "साहो"च्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. हा सिनेमा अॅक्शनपट असल्याचे दिसत आहे. 
 
सिनेमाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. या सिनेमा तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. मात्र सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरवण्यात आलेली नाही. कारण सिनेमा 2018मध्ये सिनेमागृहांमध्ये येणार आहे.