Join us

VIDEO: सलमानच्या "ट्यूबलाइट"चा टीझर रिलीज

By admin | Updated: May 4, 2017 21:46 IST

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा "ट्यूबलाइट" चा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा "ट्यूबलाइट" चा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. 2 मिनिट 7 सेकंदांच्या या टीझरमध्ये सलमानचा लूक खूप आकर्षक दिसत असून यामध्ये सैनिक आणि युद्ध असं चित्र दिसत आहेत. हा चित्रपट भारत-चीन युद्धावर आधारित आहे.
 
 गुरुवारी सकाळी दिग्दर्शक कबीर खान सलमान खानच्या काही निवडक चाहत्यांसोबत टीझर लॉन्चच्या इव्हेंटसाठी गेले होते. तेथे सलमानच्या निवडक चाहत्यांना टीजर दाखवण्यात आला.  
 
"ट्यूबलाइट" सिनेमा म्हणजे एक लव्हस्टोरी आहे. यात सलमान जवानाच्या भूमिकेत आहे. चिनी अभिनेत्री झू झू चित्रपटात सलमानची नायिका आहे. याआधी सलमान आणि कबीर खानने "बजरंगी भाईजान" आणि "एक था टायगर" हे चित्रपट एकत्र बनवलेत आणि दोन्ही चित्रपट हिट ठरलेत.