Join us  

VIDEO-'ए दिल है मुश्किल'ची पडद्यामागची मज्जा

By admin | Published: October 04, 2016 1:20 PM

दिग्दर्शक निर्मात करण जोहरचा बहुचर्चित आगामी सिनेमा'ए दिल है मुश्किल'28 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. उत्सुकता ताणण्यासाठी'ए दिल है मुश्किल'सिनेमाचा शुटिंगदरम्यानचा व्हिडिओ रिलिज

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.4- दिग्दर्शक-निर्माता करण जोहरचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल' 28 ऑक्टोबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमाचा ट्रेलर, गाणी, आणि कलाकारांमुळे रिलीजपूर्वीच सिनेमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. यातच सिनेमाबाबत आणखी उत्सुकता ताणण्यासाठी 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचा शुटिंगदरम्यानचा व्हिडिओ रिलिज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, करण जोहर आणि सिनेमाच्या टीमचे
शुटिंगदरम्यानचे किस्से सांगण्यात आले आहेत. मात्र, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. करणच्या 'ए दिल है मुश्किल'सिनेमातही पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने सिनेमा वादात अडकला आहे. त्यामुळे सिनेमाच्या रिलीजबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.