Join us  

हा चिमुरडा बनलाय तरुणींच्या दिल की धडकन, ओळखा पाहू कोण आहे हा अभिनेता?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 7:00 PM

या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या असून त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

ठळक मुद्देविकीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोला त्याच्या फॅन्सची खूपच चांगली पसंती मिळत आहे

उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्याच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

'रमण राघव', 'मनमर्जिया', 'संजू', 'राझी' आणि 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

विकीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोला त्याच्या फॅन्सची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या फोटोसोबतच शेव्ह करण्याच्या आधीचा लुक असे छानसे कॅप्शन विकीने दिले आहे. या फोटोत विकी खूपच क्यूट दिसत असल्याचे त्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर इशान खट्टर, आयुषमान खुराणा, बादशहा, इशा गुप्ता, दिया मिर्झा, तापसी पन्नू, बिपाशा बासू, मेघना गुलजार, डब्बू रत्नानी यांसारख्या सेलिब्रेटींनी देखील त्याच्या या फोटोवर कमेंट केली आहे. १२ लाखांहून अधिक लाइक्स आतापर्यंत या फोटोला मिळालेले आहेत. 

विकी सध्या त्याच्या उधम सिंग या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दिग्दर्शक शूरजित सरकारच्या सरदार उधम सिंगमध्ये त्याची भूमिका खूपच वेगळी आहे. सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला सरदार उधम सिंग या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील विकीचा लूक त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा हटके आहे.

टॅग्स :विकी कौशलउरीसंजू चित्रपट 2018मनमर्जियां