Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 6:29 PM

Sulochana Latkar: सुलोचना दीदी यांच्या जाण्याने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचं ४ जूनला निधन झालं. यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.सुलोचना दीदींना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. 

 सुलोचना यांनी जवळपास २५० मराठी-हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. सुलोचनादीदींना १९९९ मध्ये ‘पद्मश्री’, तर २००९ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.  गाजलेले चित्रपट  ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘साधी माणसं’, ‘कटी पतंग’, ‘आशा’, ‘गुलामी’. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांसाठी आदर्शवत असणाऱ्या सुलोचना यांनी कृष्णधवल युगात आपल्या बहारदार अभिनयाची कमाल दाखवत रसिकांचे मनोरंजन केले आहे. 

अभिनेत्री सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाटकर. त्या सुलोचना दीदी म्हणून सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांचा जन्म ३० जुलै, १९२८ रोजी कोल्हापूर जवळी खडकलाट गावी झाला.  सुलोचना दीदींच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने बनूबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी १९४३ मध्ये मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. 

१५०हून अधिका सिनेमात उमटवला अभिनयाचा ठसा१९४६ ते १९६१ या काळात सासुरवास (१९४६), वहिनीच्या बांगड्या (१९५३), मीठ भाकर, सांगते ऐका (१९५९), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते.

टॅग्स :सुलोचना दीदी