ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - निरागस चेहरा आणि अवखळ हास्याची देणगी लाभलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचे शुक्रवारी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णलयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे 'वक्त', 'मेरा साया', ' आप आए बहार आयी', ' वो कौन थी?' असे अनेक चित्रपट गाजले.
साधना शिवदासानी यांचा जन्म २ सप्टेंबर ,१९४१ साली कराचीत झाला, मात्र फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. साधना यांना लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्यात रस होता. १९५५ साली त्यांनी 'श्री ४२०' या प्रसिद्ध चित्रपटातील 'मुड मुड के ना देख' या गाण्यातील समूह नृत्यांगना म्हणून काम केले. १९५८ साली साधना यांनी 'अबाना' या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना ' लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकिर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप फेमस झाली होती.
त्यानंतर साधना यांनी एक मुसाफिर एक हसीना, प्रसिद्ध दिग्दर्शक विमल रॉय यांचा 'परख', हम दोनो, वक्त, मेरा साया, मेरे मेहबूब अशा अनेक हिट चित्रपटात काम केले. १९६६ साली त्यांनी 'लव्ह इन सिमला' या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के.नय्यर यांच्याशी विवाह केला.
साधनाचं फिल्म करीअर
१९५५श्री४२० मध्ये मुड़मुड़के न देख गाण्यात कोरसमध्ये
१९५८आबना भारतातला पहिला सिंधी चित्रपट
१९६० लव इन शिमलाहिरॉइन म्हणून पहिला चित्रपट
१९६०परख
१९६१ हम दोनों
१९६२प्रेमपत्र
१९६२ मनमौजी
१९६२एक मुसाफिर एक हसीना
१९६२असली नकली
१९६३मेरे महबूब
१९६४वो कौन थी
१९६४राजकुमार
१९६४पिकनिक
१९६४दुल्हा-दुल्हन
१९६५वक्त
१९६५आरजू
१९६६मेरा साया
१९६६गबन
१९६६बदतमीज
१९६७अनिता
१९६७स्त्री (उड़िया फिल्म)
१९६९सच्चई
१९६९इंतकाम
१९६९एक फूल दो माली
१९७०इश्क पर जोर नहीं
१९७१आप आए बहार आई
१९७२दिल दौलत दुनिया
१९७३हम सब चोर हैं
१९७४छोटे सरकार
१९७५अमानत
१९८१महफिल
१९९५उल्फत की नई मंजिलें