Join us  

प्रेग्नेंट आईसोबत बर्माहून भारतात पायी आल्या होत्या हेलन; ना अन्न, ना कपडे आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 11:32 AM

Helen Life Story : स्टार बनल्यानंतर हेलन यांनी काय मिळवलं हे सगळ्यांना माहीत आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे.  ते फार कमी लोकांना माहीत आहे. हेलन भारतात आल्या तेव्हा केवळ 3 वर्षांच्या होत्या.

Helen Life Story : हिंदी सिनेमाची गोल्डन गर्ल हेलन (Helen). त्यांच्याशिवाय 60-70 आणि 80 च्या दशकातील प्रत्येक आयटम सॉंग अधुरं आहे. आयटम सॉंग, कॅमियो आणि सहायक भूमिकांमध्ये दिसूनही हेलन यांची फॅन फॉलोईंग एखाद्या टॉपच्या हिरोईन इतकीच होती. लोकांच्या नजरेतून वाचवण्यासाठी हेलन या बुरका घालून बाहेर निघत होत्या. हेलन यांच्या असं काही होतं जे कोणत्याही हिरोईनकडे नव्हतं.

बर्माहून पायी भारतात आल्या होत्या हेलन

स्टार बनल्यानंतर हेलन यांनी काय मिळवलं हे सगळ्यांना माहीत आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे.  ते फार कमी लोकांना माहीत आहे. हेलन भारतात आल्या तेव्हा केवळ 3 वर्षांच्या होत्या. त्या बर्माहून भारतात 800 किलोमीटर पायी चालून आल्या होत्या. उपासमारीने शरीरावर फक्त हाडे दिसत होती. आईचा गर्भपात झाला होता आणि भाऊ वाचू शकला नाही.

हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 मध्ये रंगून, बर्मामध्ये झाला. वडील फ्रेंच आणि आई बर्मी होती. पतीपासून वेगळी झाल्यावर त्यांच्या आईने ब्रिटिश रिचर्डसन सोबत दुसरं लग्न केलं होतं. दुसऱ्या महायुद्धावेळी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात त्यांचे वडील वाचू शकले नाहीत. जपानने बर्मावर ताबा मिळवून तेथील लोकांना देशाबाहेर काढलं. जीव मुठीत घेऊन हेलन यांची  गर्भवती आई तीन लेकरांना घेऊन भारताकडे रवाना झाली. त्यांनी अनेक गावे आणि जंगल पार केले.

ना अन्न, ना कपडे. हेलन यांच्या गर्भवती आईचं रस्त्यातच मिसकॅरेज झालं आणि छोट्या भावाची तब्येत बिघडली होती. आसामला पोहोचताच ब्रिटीश सैनिकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हेलन यांच्या अंगावर फक्त हाडे होती. तर भावाचा जीव गेला. स्थिती सुधारली तेव्हा त्यांचा परिवारा कोलकाता येथे आला आणि नंतर ते मुंबईला आले. 

परस्थिती अशी होती की, 13 वर्षांची असताना हेलन यांना शाळा सोडावी लागली होती. एक फॅमिली फ्रेंड आणि डान्सर कुकूने हेलन यांना डान्स शिकवला आणि पहिला ब्रेकही दिला. 1951 मध्ये शाबिस्तान आणि आवारामध्ये हेलन यांना कोरस डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 19 वर्षीय हेलन यांना हावडा ब्रिजमधील गाण्याने मोठा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.

टॅग्स :हेलनबॉलिवूड