Join us

'वीरप्पन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

By admin | Updated: April 18, 2016 19:04 IST

चंदनतस्कर वीरप्पनच्या जीवनावर आधारीत असलेल्या 'वीरप्पन' या चित्रपटाचा फस्ट लूक आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - चंदनतस्कर  वीरप्पनच्या जीवनावर आधारीत असलेल्या 'वीरप्पन' या चित्रपटाचा फस्ट लूक आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 
राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वीरप्पन' हा आगामी चित्रपट असून सोमवारी या चित्रपटाचा फस्ट लूक आणि युट्युबवर टीझर प्रदर्शित करण्यात आला. 'वीरप्पन'चा टीझर दोन मिनीटांचा आहे. 
कर्नाटक, तामिऴनाडू आणि केरळच्या जंगलात राहून अनेक क्राइम करत धुमाकूऴ घालणा-या आणि चंदनतस्कर म्हणून सर्वांना परिचीत असलेल्या वीरप्पनच्या जीवनावर हा चित्रपट आहे. वीरप्पनला पडकण्यासाठी सरकारला स्पेशल टास्क फोर्स तयार करावे लागले आणि त्यानंतर २००४ मध्ये या स्पेशल टास्क फोर्सने क्रुरकर्मा वीरप्पनचा खात्मा केला होता. 
'वीरप्पन' या चित्रपटात वीरप्पनची भूमिका संदीप भारद्वाज साकारत असून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत उषा जाधव दिसणार आहे. हा चित्रपट येत्या मे महिन्यात २७ तारखेला प्रदर्शित होणार आहे.