Join us  

वरूण धवन बनणार बाबा, नताशा बनणार आई? ‘त्या’ फोटोनंतर चर्चा तर हीच...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:56 AM

Is Varun Dhawan's wife Natasha Dalal pregnant? : अलीकडे करवा चौथच्या दिवशी वरूणने नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केलेत आणि यातील एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

ठळक मुद्देवर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या वरुण त्याच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणारा अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे आणि पत्नी नताशा दलालसोबतचे (Natasha Dalal ) अनेक फोटो तो शेअर करत असतो. अलीकडे करवा चौथच्या दिवशी वरूणने नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केलेत आणि यातील एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. होय, हा फोटो पाहून नताशा प्रेग्नंट आहे का? तू बाबा बनणार आहेस का? असे प्रश्न विचारायला चाहत्यांनी सुरूवात केली.

गेल्या रविवारी वरुण धवनची पत्नी नताशाने करवा चौथचं व्रत साजरं केलं. याचे काही फोटो वरूणने सोशल मीडियावर शेअर केलेत. यातील एका फोटोत वरूण नताशाच्या पोटावर हात ठेवून पोझ देताना दिसतोय. त्याच्या डोळ्यांत वेगळेच भाव आहेत. हा फोटो पाहिला आणि चाहत्यांनी वरूणवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बाबा होणार आहेस का? नताशा प्रेग्नंट आहे का? मग गुड न्यूज का? असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले. काहींनी तर थेट ‘बधाई हो ब्रदीभैय्या’, म्हणत वरूणला शुभेच्छा द्यायलाही सुरूवात केली. अर्थात अद्याप वरूण व नताशा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  वरुण आणि नताशा या वर्षी जानेवारीमध्ये विवाहबद्ध झाले होते. 24 जानेवारी रोजी अलिबागमधील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. वरुण आणि नताशाने शेवटपर्यंत लग्नाची बातमी लपवून ठेवली होती. अगदी मोजक्या लोकांना या लग्नाची माहिती होती. थेट लग्नानंतरच या दोघांचे वेडिंग फोटो समोर आले होते. नताशा आणि वरूण हे स्कुल फ्रेंड आहेत. ते दोघे बºयाच वषार्पासून रिलेशनशिपमध्ये होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या वरुण त्याच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे.

टॅग्स :वरूण धवननताशा दलाल