Join us  

वैभव तत्ववादी झळकणार नव्या भूमिकेत, रहस्यमय थरारक चित्रपटातून रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 2:32 PM

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव तत्ववादी 'सिद्धांत' नावाच्या एका युवकाची भूमिका साकारत आहे. ''

महाराष्ट्रातील तमाम तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या मराठी इंडस्ट्रिमधला चॉकलेटबॉय वैभव तत्ववादीचा आणखी एक नवा कोरा चित्रपट येऊ घातला आहे. 'ग्रे' या चित्रपटातून तो एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे.  'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर आणि मिस सदाचारी' या चित्रपटांमधून वैभवने रोमँटिक भूमिकेतून महाराष्ट्रातील तरुणींना फिदा केलं होतं. शिवाय, विविध चित्रपटांमधूनही वैभवने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

'हंटर', 'बाजीराव मस्तानी', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' ‘मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’  अशा बॉलिवूड चित्रपटांमधूनही वैभवने कामं केली आहेत. बाजीराव मस्तानीमधील त्याच्या चिमाजी आप्पा या ऐतिहासिक भूमिकेचंही फार कौतुक झालं होतं.आता आगामी 'ग्रे' या चित्रपटात वैभव कोणत्याही रोमँटिक भूमिकेत नसून एका वेगळ्याच भूमिकेत तो आपल्याला दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील मिळत आहे.

 

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव 'सिद्धांत' नावाच्या एका युवकाची भूमिका साकारत आहे. ''ग्रे ”ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी  बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी शिवाय पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकारांच्या भूमिकाही आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी5 प्रीमियर रसिकांना पाहता येणार आहे. 

टॅग्स :वैभव तत्ववादीमयुरी देशमुख